India vs New Zealand 1st ODI Match Updates: भारत आणि न्यूझीलंड संघांत आजपासून तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना आज हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहे. टीम इंडियाचे या वर्षी सलग दुसरी वनडे मालिका जिंकण्याकडे लक्ष असेल. भारतीय संघाने त्यांच्या घरच्या मैदानावर आतापर्यंत न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय मालिका कधीही गमावलेली नाही.
दोन्ही संघातील आकडेवारी –
या दोन संघांमध्ये १९८८ पासून भारतीय भूमीवर सहा मालिका झाल्या आहेत. टीम इंडिया प्रत्येक वेळी विजय मिळवण्यात यशस्वी ठरली आहे. एकूण विक्रमाबद्दल बोलायचे झाले तर, मागील दोन एकदिवसीय मालिकेत भारताला न्यूझीलंडविरुद्ध विजय मिळवता आला नाही. किवी संघाने आपल्या घरच्या मैदानावर भारताला २०२० आणि २०२२ मध्ये दोन एकदिवसीय मालिकेत पराभूत केले होते. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत १६ एकदिवसीय मालिका खेळल्या गेल्या आहेत. यादरम्यान भारताने ८ आणि न्यूझीलंडने ६ मालिका जिंकल्या. त्याचबरोबर दोन मालिका अनिर्णित राहिल्या आहेत.
हैदराबादमध्ये टीम इंडियाची कामगिरी –
हैदराबादमधील टीम इंडियाची वनडेतील कामगिरी पाहिली, तर त्यांनी आतापर्यंत येथे सहा सामने खेळले आहेत. तीन जिंकले आहेत आणि तीन हरले आहेत. ऑस्ट्रेलिया, श्रीलंका आणि इंग्लंडविरुद्धचे शेवटचे तीन सामने येथे जिंकले होते. त्याचबरोबर पहिल्या तीन एकदिवसीय सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता.
हेही वाचा – रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा: सर्फराजचा झंझावात कायम; मुंबईचा पहिला डाव २९३ धावांवर गारद
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला वनडे कधी आहे?
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना १८ जानेवारी म्हणजेच बुधवारी होणार आहे.
पहिला एकदिवसीय सामना कुठे होणार?
भारत आणि न्यूझीलंड संघात पहिला एकदिवसीय हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला वनडे कधी सुरू होईल?
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना भारतीय वेळेनुसार दुपारी १:३० वाजता खेळवला जाईल. नाणेफेक दुपारी एक वाजता होईल.
सामना कोणत्या टीव्ही चॅनेलवर प्रसारित होईल?
स्टार स्पोर्ट्स नेटवर्ककडे भारत आणि न्यूझीलंड एकदिवसीय मालिका प्रसारित करण्याचे अधिकार आहेत. हा सामना तुम्ही स्टार स्पोर्ट्सच्या वेगवेगळ्या चॅनेलवर हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त देशातील इतर भाषांमध्ये कॉमेंट्रीसह पाहू शकता.
हेही वाचा – इंडिया खुली बॅडिमटन स्पर्धा: सिंधू पहिल्याच फेरीत गारद
फोन किंवा लॅपटॉपवर लाईव्ह सामना कसा बघायचा?
भारतातील हॉटस्टार अॅपवर या सामन्याचे लाईव्ह-स्ट्रीमिंग पाहता येईल.
लाईव्ह सामना फ्री कसा बघायचा?
या सामन्याचे थेट प्रक्षेपण तुम्ही डीडी स्पोर्ट्स चॅनलवर डीडी फ्री डिशवर पाहू शकता. यासाठी कोणतेही शुल्क लागत नाही.
दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन –
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, उमरान मलिक.
न्यूझीलंड: फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे, हेन्री निकोल्स, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (कर्णधार, यष्टीरक्षक), ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मिचेल सँटनर, ईश सोधी, ब्लेअर टिकनर/डग ब्रेसवेल, लॉकी फर्ग्युसन.