Sai Sudarshan’s century against Pakistan: इमर्जिंग आशिया कप २०२३ सध्या श्रीलंकेत आयोजित केला जात आहे, ज्यामध्ये भारतीय अ संघाने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. टीम इंडियाने आपल्या गटातील सर्व सामन्यांमध्ये एकतर्फी विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. यामध्ये २१ वर्षीय डावखुरा सलामीवीर साई सुदर्शन बॅटने सर्वात मोठी भूमिका बजावताना दिसला आहे. ज्यामध्ये त्याच्या बॅटमधून आतापर्यंत एक शतक आणि एक अर्धशतकी खेळी पाहायला मिळाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बुधवारी पाकिस्तान अ संघाविरुद्धच्या सामन्यात २०६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना साई सुदर्शनने १०४ धावांची उत्कृष्ट खेळी खेळली. ज्यामुले भारतीय संघाने पाकिस्तानवर ८ गडी राखून मात केली. यादरम्यान साईने ज्या पद्धतीने धावा केल्या त्या पाहून सर्वजण प्रभावित झाले. गेल्या एक वर्षात सुदर्शनने देशांतर्गत क्रिकेटमध्ये मॅचविनर म्हणून स्वत:ला सिद्ध केले आहे. प्रथम फलंदाजीला आलेल्या पाकिस्तान संघाविरुद्ध राजवर्धन हंगरगेकरने शानदार गोलंदाजी केली. त्याने ८षटकात ४२ धावा देत ५बळी घेतले. मानव सुथारने ३, रियान पराग आणि निशांत सिंधूने १-१ बळी घेत पाकिस्तानचा २०५ धावांत गुंडाळला.

कोण आहे साई सुदर्शन?

२१ वर्षीय साई सुदर्शन चेन्नईचा रहिवासी आहे. क्लब क्रिकेटमधून प्रवास सुरू करणाऱ्या सुदर्शनला २०२० मध्ये तामिळनाडूकडून देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळण्याची संधी मिळाली. डावखुरा सुदर्शनने देशांतर्गत क्रिकेटमध्ये ८ प्रथम श्रेणी, ११ लिस्ट ए आणि २५ टी-20 सामने खेळले आहेत. प्रथम श्रेणीमध्ये त्याने ४६.७७ च्या सरासरीने ५७२ धावा केल्या आहेत. त्याच वेळी, त्याने लिस्ट ए मध्ये ६६४ धावा केल्या आहेत, तर टी-२० फॉरमॅटमध्ये त्याच्या खात्यात ७६३ धावा आहेत. सुदर्शन केवळ फलंदाजीच नाही तर अर्धवेळ गोलंदाजीही करू शकतो.

साई सुदर्शनची आयपीएलमधील कामगिरी –

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२३ च्या अंतिम सामन्यात साई सुदर्शनने केवळ ४७ चेंडूत ९६ धावांची उत्कृष्ट खेळी खेळली होती. गुजरात टायटन्सने विजय मिळवला नसला तरी साईच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक झाले होते. आयपीएलच्या १६व्या हंगामात, सुदर्शनने ८ सामने खेळले आणि ३ अर्धशतकांच्या खेळीसह ५१.७१च्या सरासरीने एकूण ३६२ धावा केल्या.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Know who is sai sudarshan the left handed opener who scored a century against pakistan vbm