Shreyanka Patil’s ODI Debut in Team India : भारतीय महिला क्रिकेट संघ आणि ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघ यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यात श्रेयंका पाटीलने टीम इंडियासाठी एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. आज श्रेयंका पाटील टीम इंडियासाठी पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळणार आहे. याआधी श्रेयंकाने टीम इंडियासाठी टी-२० फॉरमॅटमध्ये पदार्पण केले होते. श्रेयंका पाटीलने महिला प्रीमियर लीगमध्ये चमकदार कामगिरी केली होती. श्रेयंका फलंदाजीसह गोलंदाजीतही अप्रतिम कामगिरी करते.
महिला प्रीमियर लीगमधील कामगिरी –
श्रेयंका पाटील महिला प्रीमियर लीगमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळते. महिला प्रीमियर लीगच्या पहिल्याच सत्रात श्रेयंकाने चमकदार कामगिरी केली होती. श्रेयंकाने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून महिला प्रीमियर लीगमध्ये ३ सामने खेळले. या काळात तिने फलंदाजी करताना तीन सामन्यांत ४९ धावा केल्या. याशिवाय श्रेयंकाने गोलंदाजी करताना ३ विकेट्स घेतल्या होते. २१ श्रेयंका महिला कॅरेबियन प्रीमियर लीग (डब्ल्यूसीपीएल) मध्ये खेळणारी पहिली भारतीय महिला देखील ठरली. गयाना अॅमेझॉन वॉरियर्सकडून खेळताना तिने ९ विकेट घेतल्या आणि स्पर्धेतील आघाडीची विकेट घेणारी खेळाडू ठरली.
कोण आहे श्रेयंका पाटील?
२१ वर्षांची श्रेयंका कर्नाटककडून देशांतर्गत क्रिकेट खेळते. उजव्या हाताने फलंदाजीसोबतच ती ऑफ-स्पिन गोलंदाजीही करते. या महिन्यात इंग्लंडविरुद्धच्या तीन टी-२० मालिकेत श्रेयंकाची पहिल्यांदाच भारतीय संघात निवड झाली होती. श्रेयंका पाटील ही बंगळुरूची रहिवासी असून वयाच्या ८ व्या वर्षापासून क्रिकेट खेळत आहे. श्रेयंका टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीला क्रिकेटमधला तिचा आदर्श मानते. याशिवाय श्रेयंका आयपीएलच्या पहिल्या सत्रापासून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला चीअर करत राहिले आहे.
टी-२० क्रिकेटमधील कामगिरी –
श्रेयंका पाटीलने याआधीच महिला क्रिकेट संघाकडून टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. श्रेयंकाने आतापर्यंत महिला क्रिकेट संघासाठी ३ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. ज्यामध्ये तिने फलंदाजी करताना केवळ ४ धावा केल्या आहेत, पण गोलंदाजी करताना श्रेयंकाने ५ विकेट्स आपल्या नावावर केल्या आहेत.
हेही वाचा – World Cup 2023 : मोहम्मद शमीच्या दुखापतीबद्दल मोठा खुलासा! विश्वचषकादरम्यान सतत घेत होता इंजेक्शन्स
दुसऱ्या वनडेसाठी भारतीय महिला संघाची प्लेइंग इलेव्हन –
स्मृती मंधाना, यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक), जेमिमाह रॉड्रिग्ज, हरमनप्रीत कौर (कर्णधार), दीप्ती शर्मा, रिचा घोष, स्नेह राणा, अमनजोत कौर, पूजा वस्त्राकर, श्रेयंका पाटील, रेणुका ठाकूर सिंग.