अँजेलो मॅथ्यूज आणि विराट कोहली या उभय संघांच्या कर्णधारांनी नाबाद १३९ धावांच्या खेळी साकारून संघाच्या धावसंख्येत सिंहाचा वाटा उचलला. परंतु भारताच्या कोहलीचे शतक सामना जिंकवून देणारे ठरले. मॅथ्यूजच्या शतकाच्या जोरावर श्रीलंकेने भारतापुढे २८७ धावांचे आव्हान ठेवले होते; पण घरच्या मैदानाचा फायदा उचलत कोहलीने झुंजार खेळीच्या जोरावर संघाला तीन विकेट्सने विजय मिळवून दिला. कोहलीला सामनावीराचा, तर मॅथ्यूजला मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला. या विजयासह भारताने श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत ५-० असे निर्भेळ यश संपादन केले.
श्रीलंकेने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यांची ४ बाद ८५ अशी अवस्था असताना पुन्हा एकदा भारताच्या गोलंदाजीच्या जाळ्यात ते अडकणार, असे वाटत होते; पण मॅथ्यूजने कर्णधाराला साजेशी शतकी खेळी साकारली. सुरुवातीला सावध खेळ करणाऱ्या मॅथ्यूजने स्थिरस्थावर झाल्यावर संयतपणे खेळ केला. फिरकीपटू कर्ण शर्माला ४०व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर कव्हर्समध्ये उत्तुंग षटकार खेचत मॅथ्यूजने अर्धशतक पूर्ण केले. अर्धशतक झाल्यावर मॅथ्यूजने भारतीय गोलंदाजांवर चौफेर हल्ला लढवला आणि पुढच्या सात षटकांमध्ये त्याने कारकिर्दीतील पहिल्या शतकाला गवसणी घातली. मॅथ्यूजने धवल कुलकर्णीच्या ४७व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर लाँग ऑनला चेंडू तटवत दोन धावा घेत शतक झळकावले. मॅथ्यूजने ६ चौकार आणि तब्बल १० षटकारांच्या जोरावर ११६ चेंडूंमध्ये नाबाद १३९ धावांची लाजवाब खेळी साकारली. मॅथ्यूजने पाचव्या विकेटसाठी थिरीमानेबरोबर १२८ धावांची भागीदारी रचली. थिरीमानेने मॅथ्यूजला सुरेख साथ देताना २ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ५२ धावा केल्या.
विजयाचा पाठलाग करताना भारताची २ बाद १४ अशी अवस्था होती. त्यानंतर कोहली आणि अंबाती रायुडू (५९) यांनी तिसऱ्या विकेटसाठी १३६ धावांची भागीदारी रचत संघाला सावरले. ही जोडी स्थिरस्थावर होईल असे वाटत असताना कोहलीने चुकीचा निर्णय घेत रायुडूला धावचीत केले. त्यानंतर एकामागून एक फलंदाज बाद होत राहिले असले तरी कोहलीने अखेपर्यंत खेळपट्टीवर पाय रोवत संघाला संघर्षपूर्ण विजय मिळवून दिला. कोहलीने १२ चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर आपली नाबाद शतकी खेळी साकारली.
संक्षिप्त धावफलक
श्रीलंका : ५० षटकांत ८ बाद २८६ (अँजेलो मॅथ्यूज नाबाद १३९, लहिरू थिरीमाने ५२; धवल कुलकर्णी ३/५७) वि. भारत : ४८.४ षटकांत ७ बाद २८८ (विराट कोहली नाबाद १३९, अंबाती रायुडू ५९; अँजेलो मॅथ्यूज २/३३).
सामनावीर : अँजेलो मॅथ्यूज.
मालिकावीर : विराट कोहली.
यहाँ के हम सिकंदर!
अँजेलो मॅथ्यूज आणि विराट कोहली या उभय संघांच्या कर्णधारांनी नाबाद १३९ धावांच्या खेळी साकारून संघाच्या धावसंख्येत सिंहाचा वाटा उचलला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 16-11-2014 at 01:48 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kohli applies final stroke as india whitewash lanka