ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत दोन्ही डावात शतक झळकावणाऱ्या विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) क्रमवारीत अव्वल वीसमध्ये आगेकूच केली आहे. दोन शतकांच्या बळावर कोहलीने अकरा स्थानांनी बढती मिळवत ७०३ गुणांसह १६वे स्थान गाठले आहे. फलंदाजांच्या क्रमवारीत भारताचा तो सर्वोत्तम स्थानी असलेला खेळाडू आहे. चेतेश्वर पुजारा १८व्या स्थानी स्थिर आहे. मुरली विजयने आठ स्थानांनी सुधारणा करत २८वे स्थान पटकावले आहे. इंग्लंडमध्ये अपयशाला सामोरे गेलेल्या कोहली ऑस्ट्रेलियाच्या मालिकेपूर्वी २६व्या स्थानी होता. मात्र अॅडलेड कसोटीत दोन्ही डावात शतकाच्या विक्रमासह कोहलीने दमदार झेप घेतली आहे. गोलंदाजांमध्ये इशांत शर्मा अव्वल वीसमधून बाहेर फेकला गेला असून, तो २१व्या स्थानी आहे. कोहलीप्रमाणे दोन्ही डावात शतक झळकावणाऱ्या डेव्हिड वॉर्नरने कारकिर्दीतील सर्वोत्तम अर्थात चौथे स्थान पटकावले आहे. स्टीव्हन स्मिथने कारकिर्दीत पहिल्यांदाच अव्वल दहामध्ये स्थान पटकावत आठवे स्थान ग्रहण केले आहे.
कोहली क्रमवारीत अव्वल वीसमध्ये
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत दोन्ही डावात शतक झळकावणाऱ्या विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) क्रमवारीत अव्वल वीसमध्ये आगेकूच केली आहे.
![कोहली क्रमवारीत अव्वल वीसमध्ये](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2014/12/k0591.jpg?w=1024)
First published on: 15-12-2014 at 12:49 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kohli breaks into top 20 of icc test rankings