ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत दोन्ही डावात शतक झळकावणाऱ्या विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) क्रमवारीत अव्वल वीसमध्ये आगेकूच केली आहे. दोन शतकांच्या बळावर कोहलीने अकरा स्थानांनी बढती मिळवत ७०३ गुणांसह १६वे स्थान गाठले आहे. फलंदाजांच्या क्रमवारीत भारताचा तो सर्वोत्तम स्थानी असलेला खेळाडू आहे. चेतेश्वर पुजारा १८व्या स्थानी स्थिर आहे. मुरली विजयने आठ स्थानांनी सुधारणा करत २८वे स्थान पटकावले आहे. इंग्लंडमध्ये अपयशाला सामोरे गेलेल्या कोहली ऑस्ट्रेलियाच्या मालिकेपूर्वी २६व्या स्थानी होता. मात्र अॅडलेड कसोटीत दोन्ही डावात शतकाच्या विक्रमासह कोहलीने दमदार झेप घेतली आहे. गोलंदाजांमध्ये इशांत शर्मा अव्वल वीसमधून बाहेर फेकला गेला असून, तो २१व्या स्थानी आहे. कोहलीप्रमाणे दोन्ही डावात शतक झळकावणाऱ्या डेव्हिड वॉर्नरने कारकिर्दीतील सर्वोत्तम अर्थात चौथे स्थान पटकावले आहे. स्टीव्हन स्मिथने कारकिर्दीत पहिल्यांदाच अव्वल दहामध्ये स्थान पटकावत आठवे स्थान ग्रहण केले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा