ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसऱ्या वन-डे सामन्यात कर्णधार विराट कोहलीने पुन्हा एकदा आपण फॉर्मात असल्याचं दाखवून दिलं. पहिल्यांदा फलंदाजी करताना भारतीय फलंदाज ऑस्ट्रेलियन गोलंदाजीसमोर कोलमडले. रोहित शर्मा, शिखर धवन, अंबाती रायुडू, धोनी हे ठराविक अंतराने माघारी परतले. मात्र विराट कोहलीने विजय शंकरच्या साथीने संघाची बाजू लावून धरत भारतीय डावसंख्येला आकार दिला. यादरम्यान विराटने आपलं शतक झळकावत भारताला सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली.
Virat Kohli is only the 6th player to score 9000 runs in International cricket as captain and the Quickest to get there – in 159 innings.
आणखी वाचाNo player before Kohli even scored 7000 International runs as captain in 159 innings. (Brian Lara – 7000 as captain in 164 inns) #INDvAUS
— Sampath Bandarupalli (@SampathStats) March 5, 2019
यादरम्यान विराट कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधार या नात्याने सर्वात जलद 9 हजार धावांचा टप्पा गाठणारा खेळाडू ठरला आहे. कर्णधार म्हणून आपल्या 159 व्या डावात विराटने ही कामगिरी करुन दाखवली आहे. याआधी ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटींगच्या नावे हा विक्रम जमा होता. पाँटींगने 204 डावांमध्ये ही कामगिरी केली होती. महत्वाची गोष्ट म्हणजे 4 हजार, 5 हजार, 6 हजार, 7 हजार आणि 8 हजार धावांचा टप्पा सर्वात जलग गाठण्याचा मानही विराट कोहलीच्याच नावे जमा आहे.
अवश्य वाचा – IND vs AUS : मायदेशात ‘हिटमॅन’च्या नावावर लाजीरवाणा विक्रम