विराट कोहलीच्या भारतीय संघाने 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेत यजमान ऑस्ट्रेलिया संघावर 2-1 च्या फरकाने मात केली. या संपूर्ण कसोटी मालिकेत भारतीय गोलंदाजांनी नेत्रदिपक कामगिरी केली. शेवटच्या कसोटी सामन्यापर्यंत ऑस्ट्रेलियाच्या सर्व फलंदाजांना बाद करण्यात भारतीय गोलंदाज यशस्वी ठरले. मोहम्मद शमी, रविंद्र जाडेजा, इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह या सर्व गोलंदाजांनी भारतीय संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. मात्र आगामी महिन्यांमध्ये क्रिकेटचं व्यस्त वेळापत्रक आणि विश्वचषकाचं आयोजन लक्षात घेता संघातील प्रमुख गोलंदाजांवरील अतिक्रिकेटचा भार कमी करणं गरजेचं असल्याचं, भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने म्हटलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

“संघातल्या या प्रमुख गोलंदाजांवरचा भार कमी करणं गरजेचं आहे. आगामी काळात आमच्यासमोरचं हे प्रमुख उद्दीष्ट असणार आहे. प्रमुख गोलंदाजांना विश्रांती देताना त्यांच्या तोडीचे 3 गोलंदाज शोधणंही तितकच महत्वाचं आहे. आम्ही या 3 पर्यायी गोलंदाजांना शोधण्याच्या प्रक्रियेमध्ये आहोत. गरजेनुसार त्यांना संघासोबत घेऊन कसोटी क्रिकेटचं महत्व पटवून देण्याचा आमचा कल असेल. आंतरराष्ट्रीय स्तरावर कोणत्या टप्प्यात चेंडू टाकणं गरजेचं आहे, गोलंदाज म्हणून त्यांनी काय विचार करणं गरजेचं आहे या सर्व गोष्टी आम्हाला शिकवाव्या लागणार आहेत.” सामना संपल्यानंतर विराट कोहली बोलत होता.

अवश्य वाचा – Video : ऐतिहासीक विजयानंतर टीम इंडिया बेभान, सिडनीच्या मैदानावर केला डान्स

ऑस्ट्रेलिया मालिकेत प्रत्येक गोलंदाजाने सर्वोत्तम कामगिरी केली आहे. त्यामुळे प्रत्येकाला विश्रांतीची गरज आहे. महत्वाच्या गोलंदाजांना आता पर्याय शोधणं गरजेचं असल्याचंही विराट म्हणाला. भारताच्या या मालिकाविजयामुळे नवोदीत खेळाडूंचा कसोटी क्रिकेटकडे पाहण्याचा दृष्टीकोनही बदलेल, अस मत विराटने व्यक्त केलं. कसोटी मालिकेत विजय मिळवल्यानंतर भारत ऑस्ट्रेलियाविरुद्ध 3 वन-डे सामन्यांची मालिका खेलणार आहे.

अवश्य वाचा – IND vs AUS : कांगारुंना गुडघे टेकवायला लावण्यात चेतेश्वर पुजारा यशस्वी – इयन चॅपल