आंतरराष्ट्रीय क्रिकेट परीषदेने (आयसीसी) जाहीर केलेल्या ट्वेन्टी-२० क्रिकेट क्रमवारीमध्ये फलंदाजांच्या यादीमध्ये भारताच्या विराट कोहलीने चौथे स्थान कायम राखले आहे. त्याचबरोबर भारताच्या सुरेश रैना आणि युवराज सिंग यांनी अनुक्रमे पाचवे आणि सहावे स्थान कायम राखण्यात यश मिळवले आहे. अव्वल दहा गोलंदाजांच्या यादीमध्ये भारताचा एकही खेळाडू नसून अष्टपैलू खेळाडूंच्या यादीमध्ये युवराज तिसऱ्या स्थानावर आहे. भारतीय संघ क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असून अव्वल स्थानावर श्रीलंकेचा संघ आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा