भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेदरम्यान सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताचा युवा फलंदाज विराट कोहलीची फलंदाजी बघून सचिन तेंडुलकरची आठवण झाल्याचे आफ्रिकेचे माजी वेगवान गोलंदाज ऍलन डोनाल्ड यांनी म्हटले.
डोनाल्ड म्हणाले की, “विराट कोहलीची शतकी खेळी बघून मला सचिन तेंडुलकरची आठवण झाली. मला १९९६ साल आठवले. त्यावेळी भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱयावर आला होता. एकट्या सचिनने आमच्या जबरदस्त गोलंदाजी माऱयाला कडवे प्रत्युत्तर दिले होते. अगदी तसेच काहीसे आज घडताना बघायला मिळाले.”
विराट आमुची ध्येयासक्ती
विराट कोहलीने दाखवून दिले की सचिनची जागा घ्यायला तो तयार आहे. त्याची फलंदाजी आक्रमक तर होतीच पण, त्यात शिस्तही होती. योग्य चेंडू ओळखून त्याचा समाचार तो घेत होता. असेही ऍलन डोनाल्ड म्हणाले.
सचिन तेंडुलकरशिवाय प्रथमच कसोटी क्रिकेटच्या रणांगणावर उतरणाऱ्या भारतीय संघाला पहिल्याच दिवशी विराट कोहलीच्या रूपाने चौथ्या स्थानाला न्याय देऊ शकणारा फलंदाज गवसला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताने ५ बाद २५५ अशी समाधानकारक मजल मारली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा