दीपक जोशी
विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत विराट कोहलीच्या नावावर १०२९ धावा आहेत. त्यामुळे आणखी ७१ धावा केल्यानंतर तो ११०० किंवा त्याहून अधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत २० पैकी १७ व्या स्थानावर पोहोचेल. या यादीत समाविष्ट होणारा तो सचिननंतर दुसरा भारतीय असेल. रोहित शर्माच्या खात्यावर आतापर्यंतच्या विश्वचषकांमधील ९८३ धावा जमा असून, त्याला अजून १७ धावांची गरज आहे. मग तो यादीत २१वे स्थान मिळवेल. याशिवाय रोहितने अजून एक शतक झळकावल्यास तो सचिनच्या सहा शतकांची बरोबरी साधेल. महेंद्रसिंग धोनीने २८ सामन्यांत यष्टीमागे ४१ बळी टिपले आहेत. कुमार संगकारा आणि अॅडम गिलख्रिस्ट यांच्या खात्यावर अनुक्रमे ५४ आणि ५२ बळी जमा आहेत. एकदिवसीय क्रिकेट प्रकारामध्ये मार्क बाऊचर (९९८ बळी) आणि गिलख्रिस्ट (९०५ बळी) यांच्यानंतर धोनी (८२८ बळी) तिसऱ्या स्थानावर आहे.