भारतीय संघाने यजमान ऑस्ट्रेलियावर अखेरच्या टी-20 सामन्यात 6 गडी राखून विजय मिळवत, 3 सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. कर्णधार विराट कोहलीने केलेल्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने सामन्यात बाजी मारली. विराटने नाबाद 61 धावा करत संघाच्या विजयात महत्वाचा वाटा उचलला. दरम्यान आजच्या सामन्यात विराटने एक अनोखा विक्रम आपल्या नावे जमा केला आहे.

अवश्य वाचा – विराटच्या अर्धशतकाने मालिका बरोबरीत, अखेरच्या टी-20 सामन्यात भारत विजयी

एखाद्या प्रतिस्पर्धी संघाविरोधात टी-20 सामन्यांमध्ये सर्वात जास्त धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराटने पहिलं स्थान पटकावलं आहे. आजच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर विराटने ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 सामन्यांमध्ये 488 धावा काढल्या आहेत. विराटने न्यूझीलंडच्या मार्टीन गप्टीलला विक्रम आज मोडीत काढला.

या यादीमध्ये विराटच्या मागे कोणते फलंदाज आहेत यावर एक नजर टाकूयात –

  • विराट कोहली विरुद्ध ऑस्ट्रेलिया – 488 धावा
  • मार्टिन गप्टील विरुद्ध पाकिस्तान – 463 धावा
  • अहमद शेहजाद विरुद्ध आयर्लंड – 436 धावा
  • अॅरोन फिंच विरुद्ध इंग्लंड – 425 धावा
  • मार्टिन गप्टील विरुद्ध दक्षिण आफ्रिका – 424 धावा

अवश्य वाचा – तांत्रिक बाबतीत आम्ही ऑस्ट्रेलियापेक्षा अधिक सरस – विराट कोहली

Story img Loader