आयपीएलचा आगामी हंगाम सुरु होण्याआधीच कोलकाता नाईट रायडर्स संघाला धक्का बसला आहे. संघाचा अनुभवी फिरकीपटू प्रवीण तांबे आगामी हंगामात खेळू शकणार नाहीये. दुबईत पार पडलेल्या T-10 लिगमध्ये सहभागी झाल्यामुळे प्रवीणवर ही कारवाई करण्यात आलेली आहे. बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने नाव न घेण्याच्या अटीवर IANS वृत्तसंस्थेला माहिती दिली.

“बीसीसीआयचा नियम खूप स्पष्ट आहे, आयपीएल किंवा कोणत्याही राज्य संघाकडून खेळणारा भारतीय खेळाडू इतर देशांमधील लिग स्पर्धेत खेळू शकत नाही. टी-१० लिगमध्ये खेळल्यानंतर तो नियमानुसार आयपीएलमध्ये खेळू शकणार नाही.” बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने माहिती दिली. कोलकाता नाईट रायडर्सने लिलावात प्रवीण तांबेवर २० लाखांची बोली लावली होती.

प्रवीण तांबेवर कोलकाता नाईट रायडर्सने २० लाखांची बोली लावली होती.

२०१३ साली प्रवीण तांबेने वयाच्या ४१ व्या वर्षी आयपीएलमध्ये पदार्पण केलं होतं. आतापर्यंत ३३ सामन्यांमध्ये तांबेच्या नावावर २८ बळी जमा आहेत. आयपीएलच्या तेराव्या हंगामाला २९ मार्चपासून सुरुवात होणार असून, मुंबईच्या वानखेडे मैदानात पहिला सामना रंगणार आहे. त्यामुळे तांबेच्या बदल्यात कोलकाता नाईट रायडर्स आपल्या संघात कोणाला सामावून घेतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Story img Loader