सुनील नरिन आणि गौतम गंभीर या हुकमी एक्कांच्या जोरावर कोलकाता नाइट रायडर्सने सहाव्या हंगामाची सुरुवात विजयाने केली. सामन्याच्या पहिल्या सत्रात सुनील नरिनने आपल्या जादुई फिरकीच्या बळावर दिल्लीच्या फलंदाजांना जखडून ठेवले. नरिनने निर्माण केलेल्या दबाबामुळे दिल्लीचा डाव १२८ धावांतच आटोपला. दुसऱ्या सत्रात कोलकात्याचा कर्णधार गौतम गंभीरने सूत्रधाराची भूमिका निभावताना ४२ धावांची सुरेख खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. खराब फॉर्ममुळे भारतीय संघाबाहेर फेकल्या गेलेल्या गंभीरने केलेली आश्वासक खेळी त्याच्या चाहत्यांना सुखावणारी होती.
जीत से आगाज
सुनील नरिन आणि गौतम गंभीर या हुकमी एक्कांच्या जोरावर कोलकाता नाइट रायडर्सने सहाव्या हंगामाची सुरुवात विजयाने केली. सामन्याच्या पहिल्या सत्रात सुनील नरिनने आपल्या जादुई फिरकीच्या बळावर दिल्लीच्या फलंदाजांना जखडून ठेवले. नरिनने निर्माण केलेल्या दबाबामुळे दिल्लीचा डाव १२८ धावांतच आटोपला.

First published on: 03-04-2013 at 11:41 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kolkata knight riders start with win