सचिन तेंडुलकर आपला ४०वा वाढदिवस कदाचित साधेपणाने साजरा करेल पण हा वाढदिवस जल्लोषात साजरा करण्याचे कोलकातावासीयांनी ठरवले आहे. कोलकाता नाइट रायडर्सविरुद्धच्या सामन्यासाठी सचिन सध्या कोलकातात आहे. हॉटेलमध्ये केक कापून सचिनच्या वाढदिवसाला सुरुवात होणार आहे.
‘‘सचिनसाठी खास ४० किलोचा केक बनवण्यात आला आहे. घाना आमि मदागास्कर येथून आणलेल्या कोकोआपासून हा चॉकलेट केक बनवण्यात येईल. सामन्याआधी आम्ही विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे,’’ असे मुंबई इंडियन्सच्या संघ व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले. या कार्यक्रमात सचिनची पत्नी अंजली आणि संघमालकीण नीता अंबानी सहभागी होणार आहेत. ‘‘क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालकडूनही (कॅब) सचिनचा वाढदिवस साजरा केला जाणार आहे. सचिनला निरोगी आणि सुदृढ आरोग्य लाभो, याच शुभेच्छा’’ असे कॅबचे अध्यक्ष जगमोहन दालमिया यांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kolkata residents planning to celebrate sachin birthday