Korean Open Badminton 2023: सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीने कोरिया ओपन सुपर ५०० बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. सात्विक आणि चिराग यांचा सामना २०२१च्या विश्वविजेत्या चीनच्या वेई केंग लियांग आणि चांग वांग या दुसऱ्या मानांकित जोडीशी झाला. चीनच्या वर्चस्वाला धक्का देत या भारतीय जोडीने हा सामना २१-१५, २४-२२ असा जिंकला आणि प्रथमच स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. इंडोनेशिया ओपन जिंकल्यानंतर या जोडीने प्रथमच स्पर्धेत प्रवेश केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारताचे स्टार बॅडमिंटनपटू सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी पुन्हा एकदा कमाल करत चिनी वर्चस्व खालसा केले आहे. भारतीय जोडीने शनिवारी कोरिया ओपन २०२३च्या पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. कोरिया ओपन सुपर ५०० बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत सात्विक आणि चिराग जोडीने चीनच्या वांग चान्स आणि लियांग वेईकेंग यांच्यावर शानदार विजय संपादन केला. भारतीय जोडीला अंतिम फेरीत दक्षिण कोरियाच्या सेउंग-जे सेओ आणि मिन-ह्युक कांग किंवा इंडोनेशियाच्या फजर अल्फियान आणि मुहम्मद रियान अर्दियांटो यांच्याशी सामना करावा लागेल.

जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या भारतीय जोडीने जिन्नम स्टेडियमवर ४० मिनिटांच्या धमाकेदार सामन्यात दुसऱ्या मानांकित चीनच्या जोडीला पराभूत केले. सात्विक आणि चिराग या चिनी जोडीविरुद्धचा हा पहिला विजय आहे. यापूर्वी भारतीय जोडीला दोन सामन्यांत पराभवाला सामोरे जावे लागले होते. दोन्ही जोडींनी उपांत्य फेरीत छोट्या रॅली केल्या आणि संधी मिळताच आक्रमण केले. एक वेळ अशी होती जेव्हा भारत आणि चीनची गुणसंख्या ३-३ आणि ५-५ अशी बरोबरीत होती. त्यानंतर भारताने ७-५ अशी छोटीशी आघाडी घेतली पण लियांगने आक्रमण सुरूच ठेवले. मध्यंतरापर्यंत भारतीय खेळाडूंना तीन गुणांची आघाडी घेण्यात यश आले. मात्र, सात्विक आणि चिराग यांनी १७-११, १९-१२ अशी आघाडी घेतली आणि पहिला गेम २१-१५ असा जिंकला.

दुसरा गेम जरा जास्त चुरशीचा झाला. दोन्ही जोड्या सुरुवातीला २-२ आणि ८-८ अशा बरोबरीत होत्या. त्यानंतर भारतीय जोडीने ११-८ अशी आघाडी घेतली. मात्र, चीनच्या खेळाडूंनी दमदार पुनरागमन केले. एक वेळ अशी होती की, दुसरा गेममध्ये गुणसंख्या ही १८-१८, १९-१९, २०-२० आणि २२-२२ अशी बरोबरीत झाली होती. मात्र सात्विक आणि चिराग जोडीने संयम ठेवत अचूक फटका मारत २४-२२ अशी आघाडी घेत सामना जिंकला. माहितीसाठी की, सात्विक आणि चिरागने स्विस ओपन आणि इंडोनेशिया ओपनचे विजेतेपद पटकावले आहे. भारतीय जोडीने या वर्षाच्या सुरुवातीला आशियाई चॅम्पियन्स सुवर्णपदक जिंकले होते.

हेही वाचा: IND vs WI: वेस्ट इंडिजमध्ये धमाल करताना भारतीय क्रिकेटर्स, सूर्यकुमार, संजू सॅमसन पोहोचले बीचवर, पाहा फोटो

उपांत्य फेरीत सरळ सेटमध्ये विजय मिळवला

याआधी या भारतीय जोडीने उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या ताकुरो होकी आणि युगो कोबायाशी यांचा सरळ गेममध्ये पराभव केला होता. तिसऱ्या मानांकित भारतीय जोडीने अवघ्या ४० मिनिटांत विजय मिळवला. जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकाच्या जोडीने पाचव्या मानांकित जोडीचा २१-१४, २१-१७ असा पराभव केला होता. कोरिया ओपनमधील भारताचे आव्हान केवळ या दोन खेळाडूंवर अवलंबून आहे.

प्रणॉय दुसऱ्या फेरीत बाहेर पडला

भारतीय बॅडमिंटनपटू एच.एस. प्रणॉय गुरुवारी कोरिया ओपन सुपर ५०० स्पर्धेतून दुसऱ्या फेरीच्या सामन्यात हाँगकाँगच्या ली चेउक य्यू याच्याकडून पराभूत होऊन बाहेर पडला. स्पर्धेतील पाचव्या मानांकित, जागतिक क्रमवारीत १०व्या क्रमांकावर असलेल्या प्रणॉयला एक तास सहा मिनिटे चाललेल्या या कठीण लढतीत त्याच्यापेक्षा आठ स्थानांनी कमी असलेल्या प्रतिस्पर्ध्याकडून १५-२१, २१-१९, १८-२१ असे पराभव पत्करावे लागले.

हेही वाचा: Asia Cup 2023: पीसीबीचा जय शाहांवर गंभीर आरोप! म्हणाले,”आम्ही फक्त नावापुरतेच यजमान, सगळंच तुम्ही करायला लागल्यावर…”

प्रियांशू राजावतचा चुरशीच्या सामन्यात पराभव झाला

पुरुष एकेरीच्या आणखी एका लढतीत, प्रियांशू राजावतने जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर असलेल्या जपानच्या कोडाई नाराओकाविरुद्ध कडवी झुंज दिली आणि एक तास २२ मिनिटे चाललेल्या दुसऱ्या फेरीच्या लढतीत १४-२१, २१-१८, १७-२१ असा पराभव पत्करावा लागला. ट्रीसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या भारतीय महिला दुहेरीच्या जोडीला ३३ मिनिटांच्या दुसऱ्या फेरीच्या सामन्यात ११-२१, ४-२१ असे पराभूत झाल्याने ‘ना हा बेक’ आणि ‘ही सो ली’ या दक्षिण कोरियाच्या द्वितीय मानांकित जोडीसमोर कोणतेही आव्हान उभे करता आले नाही.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Korean open satwik chirag beat former world champion indian pair reached final for the first time avw