AUS vs PAK Fans Make Fun Of Mohammad Rizwan As He Holds Pat Cummins’ Hand : ऑस्ट्रेलियाने पहिल्या वनडे सामन्यात पाकिस्तानचा दोन विकेट्सनी पराभव करत तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. दोन्ही संघांतील बहुप्रतिक्षित पहिला वनडे सामना मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर पार पडला. याआधी दोन्ही संघ २०२३ मध्ये भारतात झालेल्या वनडे विश्वचषकात आमनेसामने आले होते, ज्यामध्ये पॅट कमिन्सच्या नेतृत्त्वाखाली ऑस्ट्रेलियाने संघाने पाकिस्तानचा पराभव केला होता. मात्र, आता पाकिस्तान संघाचा कर्णधार बदलला आहे. सध्या पाकिस्तानची धुरा मोहम्मद रिझवान सांभाळत आहे. ज्याच्याबद्दल सोशल मीडियावर तुफान मीम्स व्हायरल होत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बाबर आझमने अलीकडेच पदावरून पायउतार झाल्यानंतर आता पाकिस्तानची धुरा मोहम्मद रिझवान सांभाळत आहे, जो मर्यादित षटकांतील क्रिकेटमध्ये संघाचे नेतृत्व करत आहे. अतिशय लक्ष केंद्रित आणि दृढनिश्चयी कर्णधार असलेल्या रिझवानने ऑस्ट्रेलियाला मालिकेत पराभूत करण्याची स्वप्न उराशी बाळगले आहे. पाकिस्तान संघाने वकार युनूसच्या नेतृत्वाखाली २००२ मध्ये अखेरची मालिका जिंकली होती. तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला सुरुवात होण्यापूर्वी पॅट कमिन्ससोबतच्या रिझवानच्या ताज्या फोटोशूटने ट्विटरवर चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आणि त्यांना वेड लावले.

या फोटोंमध्ये कमिन्स आणि रिझवान ट्रॉफीसोबत हसत आणि पोज देताना दिसत आहेत. या फोटोंमध्ये पाकिस्तानच्या कर्णधाराचा हात कमिन्सच्या हाताच्यावर दिसत होता, ज्याने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले. यानंतर चाहत्यांनी या फोटोवरुन नेहमीप्रमाणे मीम्स तयार करुन पाकिस्तानी कर्णधाराला ट्रोल करायला सुरुवात केली. ज्याचे फोटो आणि मीम्स सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

हेही वाचा – AUS vs PAK : कामरान अकमलला ऑस्ट्रेलियन संघाची खिल्ली उडवणे पडले महागात; पॅट कमिन्सने दिले चोख प्रत्युत्तर, VIDEO व्हायरल

सोशल मीडियावर मोहम्मद रिझवानच्या मीम्स व्हायरल –

पहिल्या वनडे ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो योग्य ठरला. ऑस्ट्रेलियाच्या घातक गोलंदाजीमुळे पाकिस्तानने ७० धावांपर्यंत ४ विकेट्स गमावल्या होत्या आणि दरम्यान बाबर आझम ३७ धावांवर अॅडम झम्पाच्या गोलंदाजीवर क्लीन बोल्ड झाला. नवा कर्णधार मोहम्मद रिझवानने ४४ धावा केल्या. शाहीन आफ्रिदीने २४ धावांची तर नसीम शाहने ४० धावांची खेळी खेळून प्रभावित केले. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने सर्वाधिक विकेट घेतल्या, ज्याने ३ फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले.

हेही वाचा – Mitchell Starc : मिचेल स्टार्कने मेलबर्नमध्ये घडवला इतिहास, ब्रेट ली आणि स्टीव्ह वॉ यांना मागे टाकत केला खास पराक्रम

ऑस्ट्रेलियाचा रोमहर्षक विजय –

२०४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियन संघाची सुरुवातही खराब झाली. मॅथ्यू शॉर्ट आणि जेक फ्रेझर मॅकगर्क यांनी २८ धावांच्या स्कोअरवर विकेट्स गमावल्या होत्या. त्यानंतर, स्टीव्ह स्मिथ आणि जोश इंग्लिस यांनी संघाचा डाव सावरला. या दोघांमधील ८५ धावांच्या भागीदारीमुळे सामना यजमान ऑस्ट्रेलियाच्या बाजूने झुकला. मात्र स्टीव्ह स्मिथ ४४ आणि इंग्लिस ४९ धावा करून बाद झाला. अखेर मिचेल स्टार्क आणि कर्णधार पॅट कमिन्सने ९९ चेंडू शिल्लक असताना संघाच्या विजयावर शिक्कमोर्तब केला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kripya mujhe na haraye fans make fun of mohammad rizwan as he holds pat cummins hand in latest pic ahead aus vs pak vbm