खार जिमखाना येथे चालू असलेल्या पहिल्या महाराष्ट्र राज्य वरिष्ठ निवड बॅडमिंटन चाचणी स्पर्धेत क्रिश रहेजा आणि करिश्मा वाडकर यांनी सनसनाटी विजयाची नोंद केली. क्रिशने आठव्या मानांकित अक्षत राऊतवर १२-१५, १५-९, १५-१० अशी मात केली. मयांक गोळेने यश साळगावकरचा १५-१०, १५-६ असा पराभव केला. मनदीप सिंगने अजित कुंभारचा १०-१५, १५-६, १५-९ असा पराभव केला. महिलांमध्ये करिश्मा वाडकरने पाचव्या मानांकित संपदा सहस्त्रबुद्धेवर १५-१०, १५-१२ असा सनसनाटी विजय मिळवला. रिद्धी पजवानीने रुचा निकमला १५-१३, १५-१३ असे नमवले. रिया पिल्लेने मुग्धा पाटीलचा १५-१, १५-३ असा धुव्वा उडवला.

Story img Loader