KRK Tweet On VIrat Kohli Went Viral : कमाल राशिद खान म्हणजेच केआरके सोशल मीडियावर सक्रीय राहून खळबळजनक ट्वीट करत असतो. आताही केआरकेनं केलेलं एक ट्वीट खूप व्हायरल झालं आहे. या ट्वीटवर चाहत्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया येत आहेत. केआरकेनं जे ट्वीट केलं आहे, यामध्ये त्याने विराट कोहलीच्या नावाचा उल्लेख केला आहे. कोहलीला ‘देश द्रोही’ चित्रपटाच्या सीक्वलमध्ये कास्ट करण्याबाबत केआरकेनं ट्वीटमध्ये म्हटलं आहे. केआरकेनं ट्वीट करत म्हटलं, मी विराट कोहलीच्या डान्स स्किल्सने खूप प्रभवीत झालो आहे. त्यामुळे मी विराटला माझा चित्रपट ‘देश द्रोही २’ मध्ये आयटम नंबर करण्याची ऑफर देत आहे.
केआरकेनं केलेलं हे ट्वीट प्रचंड व्हायरल होत आहे. कोहली मैदानात नेहमीच डान्स करून चाहत्यांचं मनोरंजन करत असतो. अशातच केआरकेनं पोस्ट शेअर केली आहे. यामध्येही विराट मैदानात डान्स करत असल्याचं पाहायला मिळत आहे. केआरकेनं जाणून बुजून असं ट्वीट करत विराटच्या चाहत्यांना भडकवण्याचं काम केलं असल्याचं बोललं जात आहे.
यविराट कोहली आयपीएल २०२३ मध्ये व्यग्र आहे. किंग कोहलीने तीन सामन्यात १६४ धावा केल्या आहेत. यामध्ये दोन अर्धशतकांचा समावेश आहे. आयपीएल २०२३ मध्ये आरसीबीचा पुढील सामना दिल्ली कॅपिटल्सविरोधात होणार आहे. आरसीबीने आतापर्यंत ३ सामन्यांपैकी २ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. दिल्ली कॅपिटल्सता तिन्ही सामन्यांत पराभव झाल्याने त्यांना पहिल्या विजयाची प्रतिक्षा असणार आहे, त्यामुळे हा सामना अधिक रंगतदार होण्याची शक्यता आहे.