Krunal Pandya in Pushpa 2 Movie Photo Viral: भारतात सध्याच्या घडीला भारत वि ऑस्ट्रेलियामधील बॉर्डर गावस्कर ट्रॉफीबरोबरच अल्लु अर्जुनचा चित्रपट पुष्पा २ ची देखील चर्चा सुरू आहे. अल्लू अर्जुनचा ब्लॉकबस्टर चित्रपट ‘पुष्पा 2’ चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात कोट्यवधींची कमाई केली आहे. या चित्रपटाबरोबरच त्यातील खलनायकही तितकाच चर्चेत आहे. हा खलनायक क्रिकेटपटू कृणाल पंड्या असल्याचे चाहते म्हणत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुष्पा २ चित्रपटातील जो खलनायक आहे तो क्रिकेटपटू कृणाल पंड्या असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. या क्रिकेटपटूच्या चित्रपटातील लूकमुळे तो अगदी कृणाल पंड्यासारखाच दिसतो. पण त्याचं नाव तारक पोनप्पा आहे. तारक पोनप्पाच्या लूकची सोशल मीडियावर बरीच चर्चा आहे. काही चाहत्यांनी लिहिले की वाह, कृणाल पंड्याने काय भूमिका साकारली आहे? तर एकाने लिहिले की पुष्पा २ मध्ये कृणाल पंड्याचा गेस्ट रोल आहे.

हेही वाचा – WTC Qualification Scenario: टीम इंडिया आफ्रिका-ऑस्ट्रेलियाने मागे टाकल्यानंतर WTC फायनलमध्ये कशी पोहोचणार? कसं आहे समीकरण

सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या त्याच्या फोटोमुळे या चर्चांना उधाण आले. भारतीय क्रिकेटर कृणाल पंड्याने ‘पुष्पा 2’ मध्ये बुग्गा रेड्डीच्या भूमिकेत एक छोटीशी भूमिका साकारली आहे, असे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पण प्रत्यक्षात हे दोन्ही व्यक्ती वेगळे आहेत. पुष्पा २ चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारणारा व्यक्ती वेगळा आहे. तारक आणि कृणाल यांच्यात लोक गोंधळले होते. पण, बुग्गा रेड्डीची भूमिका कृणाल पंड्याने नाही तर तारक पोनप्पाने केली आहे. पोनप्पा हा दक्षिणेतील प्रसिद्ध कलाकार आहे.

हेही वाचा – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या सेटवर ‘अशी’ होते रिहर्सल! शिवालीने केलं भन्नाट ‘टंग ट्विस्टर’, मालवणी भाषा अन्…; पाहा व्हिडीओ

तारक पोनप्पाने पुष्पा २ मध्ये कोगतम बुग्गा रेड्डीची भूमिका साकारली आहे. चित्रपटात तो केंद्रीय मंत्री कोगतम वीरा प्रताप रेड्डी यांचा पुतण्या आणि कोगातम सुब्बा रेड्डी यांच्या मुलाची भूमिका साकारत आहे. चित्रपटातील एका दृश्यात त्याचा लूक असा आहे की तो बांगड्या, नाकात नथ, गळ्यात हार आणि कानातले घातलेला दिसतो. या चित्रपटातील त्याचा लूक चाहत्यांना भावला आहे. तारक पोनप्पाने यापूर्वी केजीएफ – चॅप्टर २ या चित्रपटात दया नावाची भूमिका साकारली होती.

हेही वाचा –IND vs AUS: “सिराज वेडा आहेस का तू?…”, भारताचे माजी क्रिकेटपटू मोहम्मद सिराजवर संतापले, हेडच्या वादावर केलं मोठं वक्तव्य

कृणाल पंड्या सध्याच्या घडीला भारतीय संघातून बाहेर असला तरी तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये आणि आयपीएलमध्ये खेळताना दिसतो. सध्या कृणाल पंड्या बडोदा क्रिकेट संघाचा कर्णधार असून सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत खेळताना दिसत आहे. त्याच्या नेतृत्त्वाखाली बडोदा संघ चांगली कामगिरी करताना दिसला आहे.