टी-२० विश्वचषक २०२२ पार पडल्यानंतर भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात वनडे आणि टी-२० मालिका खेळली जाणार आहे. न्यूझीलंड दौऱ्यासाठी बीसीसीआयने सोमवारी भारतीय संघ जाहीर केला आहे. जाहीर केलेल्या वनडे संघात युवा वेगवान गोलंदाज कुलदीप सेनला संधी मिळाली आहे. त्यावर कुलदीप सेनने भावनिक प्रतिक्रिया दिली आहे.

‘रेवाचनल एक्स्प्रेस’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या कुलदीप सेनचा राजस्थान रॉयल्सने गेल्या वर्षी उच्च बोली लावून संघात समावेश केला होता. आयपीएल २०२२ मध्ये त्याने चमकदार कामगिरी करताना, १४०-१४५ किमी वेगाने गोलंदाजी केली. कुलदीपची न्यूझीलंडमध्ये खेळल्या जाणाऱ्या एकदिवसीय मालिकेसाठी निवड झाली आहे.

mla sanjay rathod upset over baseless news spread against him by media
“मन दुखावले, जिव्हारी लागले…” आमदार संजय राठोड असे का म्हणाले?
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Rohit Sharma Furious on Yashasvi Jaiswal Team Bus Leaves Without Him due to Indiscipline of India Opener
IND vs AUS: रोहित शर्मा यशस्वीवर वैतागला, जैस्वालला हॉटेलमध्येच सोडून गेली टीम बस; नेमकं काय घडलं?
nana patekar amitabh bachchan KBC 16
नातवाच्या जन्मानंतर अमिताभ बच्चन मिठाई घेऊन आले अन्…, नाना पाटेकरांनी सांगितला किस्सा; ‘ती’ भेटवस्तू अजूनही ठेवलीये जपून
माणदेशी फाउंडेशनच्या स्टेडियमचे सचिन तेंडुलकर याच्या हस्ते उद्घाटन
Syed Mushtaq Ali Trophy
SMAT 2024: मुंबई सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत! रहाणे-शॉच्या फलंदाजीसमोर विदर्भचा संघ पडला फिका
Sanjay Raut Brother Post News
Sanjay Raut Brother : संजय राऊत यांच्या सख्ख्या भावाची पोस्ट चर्चेत; डिलिट करत म्हणाले, “मी..”
Shaheen Shah Afridi becomes youngest bowler to complete 100 wickets in all 3 formats
Shaheen Afridi: शाहीन शाह आफ्रिदीचा मोठा पराक्रम, क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा सर्वात तरूण गोलंदाज

त्याचबरोबर त्याने आपल्या करिअरशी संबंधित एक मोठे वक्तव्य केले आहे. ज्यामध्ये तो आपल्या कारकिर्दीचे श्रेय केरळ आणि राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनला देत आहे. त्याचवेळी या वक्तव्यानंतर क्रिकेट विश्वात पुन्हा एकदा संजू सॅमसनबाबत चर्चा सुरू झाली आहे.

न्यूझीलंड मालिकेसाठी वनडे मालिकेत निवड झालेल्या कुलदीप सेनने आपल्या कारकिर्दीचे श्रेय संजू सॅमसनला दिले आहे. त्यांनी आरआर वेबसाइटद्वारे सांगितले की, ”मी केरळविरुद्ध सय्यद मुश्ताक अली खेळत होतो, मी यॉर्कर, लांबीचे चेंडू टाकत असताना संजू सॅमसनने माझ्याकडे पाहिले – मग त्याने राजस्थान रॉयल्सच्या चाचणीबद्दल सांगितले. त्याचबरोबर त्याने मला संपर्क करण्यासाठी एक नंबर पाठवला होता.”

राजस्थान रॉयल्स संघात त्याचा समावेश होणे हा योगायोग नसून, संजूने त्याला चाचणी देण्यासाठी प्रोत्साहन दिले होते, हे त्याच्या विधानावरून स्पष्टपणे दिसून येते.

हेही वाचा – IPL 2023 : पुढील मोसमासाठी पंजाब किंग्जच्या कर्णधारपदी ‘या’ खेळाडूची नियुक्ती, कोण आहे घ्या जाणून

राजस्थानकडून खेळताना कुलदीप सेनने यंदाच्या आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी केली होती. ज्याच्या जोरावर त्याची प्रथम विश्वचषक संघात नेट गोलंदाज म्हणून निवड झाली. त्यानंतर न्यूझीलंड दौऱ्यासाठी त्याचा मुख्य संघात समावेश करण्यात आला. कुलदीप सेनने त्याच्या वेगवान गोलंदाजीने निवडकर्त्यांना खूप प्रभावित केले आहे. त्याने राजस्थानसाठी डेथ ओव्हर्समध्ये अनेक वेळा शानदार यॉर्कर टाकले आहेत.

Story img Loader