Kuldeep Yadav Fastest 50 Wickets Taken by India in T20 Cricket: वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात भारताने यजमानांचा ७ गडी राखून पराभव केला. त्याचबरोबर पाच सामन्यांच्या मालिकेत स्वतःला कायम ठेवले. भारताच्या या विजयात कुलदीप यादवच्या गोलंदाजीने महत्त्वाची भूमिका बजावली. या सामन्यात त्याने 3 बळी घेतले. तसेच या सामन्यात कुलदीपने टी-२० क्रिकेटमध्ये इतिहास रचला. वास्तविक, कुलदीप यादवने आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये सर्वात जलद ५० विकेट्स घेण्याचा विक्रम केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कुलदीप यादवने युजवेंद्र चहलचा विक्रम मोडत रचला इतिहास –

कुलदीप यादवने वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात ४ षटकात २८ धावा दिल्या. त्याचबरोबर वेस्ट इंडिजच्या ३ फलंदाजांना आपल्या गळाला लावले. यासह त्याने ५० टी-२० आंतरराष्ट्रीय विकेट्सही पूर्ण केल्या. कुलदीपने ३० सामन्यांच्या २९ डावांमध्ये १४.२८ च्या सरासरीने आणि ६.४७ च्या इकॉनॉमीने टी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये ५० विकेट्स पूर्ण केल्या. या दरम्यान कुलदीपने युजवेंद्र चहलचा विक्रम मोडला. चहलने ३४ सामन्यांत ५० बळी घेतले होते.

भारतासाठी सर्वात जलद ५० विकेट घेणारे खेळाडू –

कुलदीप यादवपूर्वी युझवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, आर अश्विन आणि भुवनेश्वर कुमार यांच्या नावावर सर्वात जलद ५० बळी घेण्याचा विक्रम होता. चहलने ३४ सामन्यात ५० तर बुमराहने ४१ सामन्यात ५० बळी पूर्ण केले. त्याचबरोबर अश्विनने ४२ आणि भुवनेश्वर कुमारने ५० सामन्यांमध्ये हा टप्पा पार केला होता. युजवेंद्र चहल हा टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारताकडून सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे. दुसऱ्या क्रमांकावर भुवनेश्वर कुमार आहे. दुसरीकडे, त्याचबरोबर सर्वात कमी चेंडूत ५० बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत कुलदीप यादव चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे.

टी-२० मध्ये सर्वात कमी सामन्यात ५० विकेट घेणारे टॉप ५ गोलंदाज –

अजंथा मेंडिस – २६
मार्क अडायर – २८
कुलदीप यादव – ३०
इम्रान ताहिरने – ३१
युजवेंद्र चहल ३४

हेही वाचा – IND vs WI 3rd T20: सलग तिसऱ्या सामन्यात तिलक वर्माची शानदार खेळी, गौतम गंभीरचा मोडला ‘हा’ विक्रम

कमी चेंडूत ५० बळी घेण्याच्या बाबतीत कुलदीपने हसरंगाला टाकले मागे –

सर्वात कमी चेंडूत ५० बळी घेणार्‍या गोलंदाजांवर नजर टाकली तर श्रीलंकेचा अजंथा मेंडिस अव्वल आहे. त्याने ६०० चेंडूत ५० बळी घेतले आहेत. या यादीत कुलदीप यादव चौथ्या क्रमांकावर आहे. त्याने ६३८ चेंडूत ५० बळी घेतले आहेत. यामध्ये त्याने श्रीलंकेचा स्टार फिरकीपटू वानिंदू हसरंगाला मागे टाकले आहे.

हेही वाचा – IND vs WI 3rd T20: सूर्यकुमार यादवचे षटकारांचे शतक! रोहित शर्माला मागे टाकत ख्रिस गेलच्या ‘या’ विक्रमाशी केली बरोबरी

टी-२० मध्ये सर्वात कमी चेंडूत ५० विकेट्स टॉप ५ गोलंदाजांची यादी –

६००- अजंथा मेंडिस (श्रीलंका)
६२०- मार्क अडायर (आयर्लंड)
६२४- लुंगी एनगिडी (दक्षिण आफ्रिका)
६३८- कुलदीप यादव (भारत)
६६०- वानिंदू हसरंगा (श्रीलंका)

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kuldeep yadav overtakes yuzvendra chahal to become indias fastest 50 wicket haul in t20 cricket vbm