Kuldeep Yadav’s reaction after the win: सोमवारी आशिया चषक स्पर्धेतील सुपर फोर फेरीत भारताने पाकिस्तानवर २२८ धावांनी सर्वात मोठा विजय मिळवला. या भारताच्या विजयात विराट-राहुलनंतर कुलदीप यादवनेही मोलाचे योगदान दिले. कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडियमवर आशिया चषक स्पर्धेतील राखीव दिवशी कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध चेंडूने चमकदार कामगिरी केली. या कामगिरीनंतर कुलदीप यादवने विजयावर प्रतिक्रिया दिली.

डावखुरा मनगटी फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने या सामन्यात पाच विकेट्स घेतल्या. या दरम्यान त्याने आठ षटकांत २५ धावा दिल्या. टीम इंडियाच्या २२८ धावांच्या शानदार विजयानंतर कुलदीपने वन-डे फॉरमॅटमध्ये यशस्वी होण्यासाठी केलेल्या तांत्रिक बदलांबद्दल सांगितले. पाकिस्तानविरुद्धच्या मोठ्या विजयानंतर, कुलदीपने सांगितले की गुडघ्याच्या शस्त्रक्रियेनंतर, त्याने रन-अप बदलले आणि आक्रमक दृष्टीकोन स्वीकारण्यावर काम केले, ज्यामुळे त्याला अलीकडच्या काळात अधिक बळी मिळण्यास मदत झाली आहे.

सामन्यानंतर बोलताना कुलदीप यादव म्हणाला, “गुडघ्याच्या शस्त्रक्रियेनंतर मी गेल्या दीड वर्षांपासून नियमित खेळत आहे. माझी रन-अप थोडासा सरळ झाला आहे. माझ्या गोलंदाजीच्या लयीत अधिक आक्रमकता आहे, क्रीजपर्यंत पोहोचण्याचा दृष्टिकोन चांगला आहे आणि कदाचित माझी गोलंदाजी पूर्वीसारखीच चांगली आहे. हात खूप खाली पडत होता, आता तो नियंत्रणात आहे आणि आता तो फलंदाजाकडे अधिक वळतो आहे.”

हेही वाचा – IND vs PAK: ऐतिहासिक विजयानंतर भारतीय खेळाडूंनी स्विमिंग पूलमध्ये केली मस्ती, कोहली-रोहितने केला डान्स, पाहा VIDEO

तो पुढे म्हणाला, “तसेच, मी माझी फिरकी आणि ड्रिफ्ट गमावलेली नाही, ती अजूनही आहे आणि माझा वेगही वाढला आहे. म्हणूनच ते मला मदत करत आहे. गेल्या काही काळापासून मी सतत चांगल्या लांबीवर चेंडू टाकण्याचा विचार करत होतो. यामुळे तुम्हाला विकेट घेण्याची अधिक संधी मिळते. मी गोलंदाजी करताना थोडा अधिक आक्रमक असतो, प्रत्येक वेळी स्टंपला लक्ष्य करतो, ज्यामुळे मला खरोखर खूप मदत होते.”

हेही वाचा – IND vs PAK: ‘लगता है पड़ोसियों ने टीवी के साथ-साथ मोबाईल भी…’; भारताच्या विजयानंतर इरफान पठाणने पाकिस्तानींना केले ट्रोल

पाकिस्तानविरुद्धच्या पाच विकेट्स माझ्या कायम लक्षात राहतील –

पाकिस्तानविरुद्ध पाच विकेट्स घेतल्यानंतर, कुलदीप पुढे म्हणाला की, अशा कामगिरीमुळे मनोबल वाढण्यास मदत होते. त्याचबरोबर कारकिर्दीला अलविदा केल्यानंतरही तो ते लक्षात ठेवेल. तो म्हणाला, “जेव्हा तुम्ही मोठ्या संघाविरुद्ध पाच विकेट घेता, तेव्हा ते खरोखरच तुमचे मनोबल वाढवते. जेव्हा मी निवृत्त होईन, तेव्हा पाकिस्तानविरुद्ध घेतलेल्या पाच विकेट्स कायम लक्षात ठेवेन.”