Kuldeep Yadav Statement on His Wedding: टी-२० विश्वचषक २०२४चे विजेतेपद पटकावल्यानंतर टीम इंडियाचे खेळाडू सध्या विश्रांती घेत आहे. सर्वच खेळाडू आपल्या कुटुंबासह या विजयाचा आनंद साजरा करत वेळ घालवत आहे. यादरम्यान आता टीम इंडियाचा चायनामन फिरकी गोलंदाज कुलदीप यादवची नुकतीच मुलाखत समोर आली आहे. ज्यामध्ये त्याने आपल्या लग्नाबाबत मोठा खुलासा केला आहे. वर्ल्डकप विजयी संघामधील काही बॅचलर खेळाडूंपैकी कुलदीप एक आहे. त्यामुळे त्याच्या लग्नाच्या चर्चेने सर्वांचे लक्ष वेधले होते. कुलदीप बॉलिवूड अभिनेत्रीशी लग्न करणार आहे, अशी चर्चा होती. पण आता कुलदीपने त्याच्या लग्नाबाबत एक गोड बातमी दिली आहे.

हेही वाचा – VIDEO: “सूर्याच्या हातात कॅच बसला नसता तर त्याला…”, रोहितने दम भरताच आमदारांना हसू आवरेना; पाहा काय घडलं?

Sadanand literary conference
सांगली: जात घट्ट कराल तसा माणूस पातळ होईल; लवटे
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
aadar jain alekha advani wedding videos
३ वर्षे बॉलीवूड अभिनेत्रीला केलं डेट, ब्रेकअपनंतर तिच्याच मैत्रिणीबरोबर थाटला संसार; अभिनेत्याच्या लग्नातील Video Viral
siddharth chandekar
सिद्धार्थ चांदेकर-मिताली मयेकरचं लग्नादिवशीच झालेलं मोठं भांडण; अभिनेता किस्सा सांगत म्हणाला, “पहाटे साडेतीन वाजता …”
Yograj Singh coach of Arjun Tendulkar
Yograj Singh: अर्जुन तेंडुलकरनं योगराज सिंग याचं कोचिंग मध्येच का सोडलं? युवराज सिंगच्या वडिलांनी सांगितलं खरं कारण
Masaba Gupta baby girl name is Matara
३ महिन्यांची झाली लेक, बॉलीवूड अभिनेत्रीने नाव केलं जाहीर; ‘मतारा’चा अर्थ काय? वाचा…
Rajesh Khanna
सात वर्षे लिव्ह इन, अभिनेत्रींबरोबर अफेअर्सच्या चर्चा अन् डिंपल कपाडियांशी लग्न; राजेश खन्ना-अंजू महेंद्रूच्या लव्ह स्टोरीचा ‘असा’ झालेला शेवट
मृणालने ठाकूरनं 'पाणी' सिनेमाच्या टीमचं कौतुक केलं आहे. (Mrunal Thakur/ Instagram)
मृणाल ठाकूरनं ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्याचं केलं कौतुक; पोस्ट शेअर करत म्हणाली, “राष्ट्रीय पुरस्कारासाठी तुम्ही…”

टी-२० विश्वचषकातील सुरूवातीच्या सामन्यांमध्ये कुलदीप यादवला खेळण्याची संधी मिळाली नाही. परंतु नंतर मोहम्मद सिराजला वगळण्यात आले आणि कुलदीप यादवचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला. यानंतर कुलदीपने अप्रतिम गोलंदाजीचे प्रदर्शन केले. या स्पर्धेत कुलदीपने १-०विकेट्स घेतल्या. सध्या कुलदीप त्याच्या मूळ गावी कानपूरमध्ये आहे. विश्वचषक जिंकून कुलदीप जेव्हा कानपूरला पोहोचला तेव्हा तेथे त्याचे भव्य स्वागत करण्यात आले.

हेही वाचा – IND vs ZIM : अभिषेक शर्माने गिलच्या बॅटने झळकावलं पहिलं शतक; म्हणाला, ‘मी अंडर-१२ संघापासून त्याच्या…’

चाहत्यांना लवकरच कुलदीपच्या लग्नाची चांगली बातमी मिळेल असे संकेत त्याने दिले आहेत. कुलदीपने बॉलीवूड अभिनेत्रीसह लग्न करण्याच्या अफवांवरही या मुलाखतीत भाष्य केले. त्याचप्रमाणे त्याची जोडीदार कशी असावी, यावरही त्याने दिलखुलास उत्तर दिलं. लग्नाबाबत सांगताना कुलदीप म्हणाला, “तुम्हाला लवकरच माझ्या लग्नाची चांगली बातमी मिळेल, पण मी कोणत्या अभिनेत्रीशी लग्न करणार नाहीय. महत्त्वाचं म्हणजे ती माझी आणि माझ्या कुटुंबाची काळजी घेणारी असली पाहिजे,” असं कुलदीप यादवने मुलाखतीत सांगितलं.

कुलदीप मुलाखतीदरम्यान म्हणाला घरी परतल्यानंतर आपल्या माणसांना पाहून बरं वाटलं. विश्वचषक जिंकणं ही निश्चितच आनंदाची बाब आहे. हा चषक आमच्यापेक्षा आपल्या देशवासियांचा आहे. दरम्यान, पंतप्रधान मोदींच्या भेटीबद्दल कुलदीप म्हणाला की, त्यांची भेट घेण्याचा अनुभव खूप चांगला होता.

Story img Loader