पीटीआय, ब्रिजटाऊन (बार्बाडोस)

वातावरण आणि खेळपट्टी लक्षात घेऊन संघ व्यवस्थापनाला काही अवघड निर्णय घ्यावे लागतात. त्यामुळे चांगली कामगिरी करूनही अनेकदा मला पुढील सामन्यासाठी संघाबाहेर राहावे लागते. मात्र, मला आता याची सवय झाली आहे, असे वक्तव्य भारताचा चायनामन फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने केले.

world chess championship loksatta
गुकेशच्या नवचैतन्याची कसोटी!
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
reactions of students participated in loksatta lokankika competition zws
म्हणूनच लोकसत्ता लोकांकिका इतर स्पर्धांपेक्षा खूप आगळीवेगळी ठरते; स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया
Vinayak Raut, BJP , former MP Vinayak Raut,
भाजपचे मताधिक्य गुणवत्तेवर नसून चोरी करून, माजी खासदार विनायक राऊत यांची टीका
hitendra thakur slams bjp for marathon
मॅरेथॉन घेण्याची ताकद आहे का? राजकारण करणार्‍या भाजपला हितेंद्र ठाकूरांचा सवाल
Bharat Gogawale, Bharat Gogawale minister desire,
भरत गोगावले यांची मंत्रिपदाची इच्छा यंदा तरी पूर्ण होणार का ?
Captain Rohit Sharma reacts after disappointing Adelaide Test performance by batsmen sports news
फलंदाजांची कामगिरी निराशाजनक, गोलंदाजीत बुमराला साथ आवश्यक! अॅडलेड कसोटीनंतर कर्णधार रोहितची प्रतिक्रिया
India vs Australia Border Gavaskar Trophy Australia dominate in second Test sport news
पिछाडीनंतर पडझड, भारतीय फलंदाजांकडून निराशाच; हेडच्या शतकामुळे ऑस्ट्रेलियाचा दबदबा

इंग्लंडमध्ये झालेल्या २०१९च्या एकदिवसीय विश्वचषकानंतर कुलदीपला भारतीय संघात सातत्याने स्थान मिळालेले नाही. कुलदीपने गेल्या काही काळापासून आपल्या गोलंदाजीत वैविध्य आणण्याचा प्रयत्न केला असून या मेहनतीचे फळ त्याला वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात मिळाले. त्याने केवळ सहा धावांच्या मोबदल्यात चार गडी बाद केले आणि सामनावीराचा पुरस्कार पटकावला. विंडीजविरुद्ध मिळालेल्या संधीचे सोने केल्याचे समाधान असल्याचे पहिल्या एकदिवसीय सामन्यानंतर कुलदीप म्हणाला.

‘‘वातावरण आणि त्यानुसार केलेली संघाची रचना, यामुळे मला बरेचदा संघाबाहेर राहावे लागते. मात्र, मला आता याची सवय झाली आहे. मी सहा वर्षांहूनही अधिक काळापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत आहे. त्यामुळे संघातून आत-बाहेर होणे ही माझ्यासाठी सामान्य गोष्ट झाली आहे,’’ असे कुलदीपने सांगितले.

तसेच गोलंदाजी आणि मानसिकतेतील बदलाबद्दल विचारले असता कुलदीप म्हणाला, ‘‘मी आता बळी मिळवण्याचा फारसा विचार करत नाही. मी प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करतो. योग्य टप्प्यावर गोलंदाजी करण्याचा माझा प्रयत्न असतो.’’कुलदीपने या वर्षी नऊ एकदिवसीय सामन्यांत १९ गडी बाद केले आहेत. मात्र, क्रिकेटच्या तीनही प्रकारांत त्याला सातत्याने संधी मिळालेली नाही. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये कुलदीपने बांगलादेशविरुद्ध पहिल्या कसोटीत आठ बळी मिळवतानाच ४० धावांचेही योगदान दिले होते. परंतु दुसऱ्या कसोटीसाठी त्याला संघात स्थान मिळाले नाही.

‘‘गेल्या दीड वर्षांत, दुखापतीतून सावरल्यानंतर पुनरागमन करताना मी केवळ योग्य टप्प्यावर गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला आहे. गोलंदाज म्हणून तुम्हाला कधी बळी मिळतात, तर कधी मिळत नाहीत. मात्र, तुम्ही सातत्याने चांगली गोलंदाजी करणे गरजेचे असते. सामन्याची परिस्थिती लक्षात घेणेही आवश्यक आहे. प्रतिस्पर्धी संघाने चार-पाच गडी लवकर गमावले असले, तरच मी गोलंदाजीत वैविध्य आणतो. अन्यथा माझा एक टप्पा धरून गोलदांजी करण्याचा प्रयत्न असतो,’’ असे कुलदीपने नमूद केले.

भारताचे मालिकेत विजयी आघाडीचे लक्ष्य!

पहिल्या सामन्यातील मोठय़ा विजयानंतर भारतीय संघाचे आज, शनिवारी होणारा वेस्ट इंडिजविरुद्धचा दुसरा एकदिवसीय क्रिकेट सामना जिंकत तीन सामन्यांच्या मालिकेत विजयी आघाडी घेण्याचे लक्ष्य असेल. तसेच भारतीय संघाचे फलंदाज या सामन्यात आपल्या नियमित क्रमांकांवर खेळणे अपेक्षित आहे.

’ वेळ : सायं. ७.३० वा.
’ थेट प्रक्षेपण : डीडी स्पोर्ट्स, जिओ सिनेमा, फॅनकोड अ‍ॅप

Story img Loader