मुंबईचा मध्यमगती गोलंदाज धवल कुलकर्णीने पायाच्या दुखापतीमुळे वेस्ट इंडिजविरुद्ध होणाऱ्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतून माघार घेतली आहे. राष्ट्रीय निवड समितीने त्याच्या जागी आर. विनय कुमारची भारतीय संघात निवड केली आहे. कोची येथे २१ नोव्हेंबरपासून या मालिकेला सुरुवात होईल. दुखापतीमुळे धवलची एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी पुन्हा हुकली आहे. २००९मध्ये न्यूझीलंड दौऱ्यासाठी धवलला भारतीय संघात स्थान मिळाले होते, पण एकही सामन्यात त्याला खेळण्याची संधी मिळाली नव्हती.
संग्रहित लेख, दिनांक 15th Nov 2013 रोजी प्रकाशित
धवलची माघार
मुंबईचा मध्यमगती गोलंदाज धवल कुलकर्णीने पायाच्या दुखापतीमुळे वेस्ट इंडिजविरुद्ध होणाऱ्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या
First published on: 15-11-2013 at 03:38 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kulkarni ruled out of odi series against west indies