Kumar Sangakkara impressed by Ben Stokes’ leadership: एजबॅस्टन येथे इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया अॅशेस मालिकेतील पहिला कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यात बेन स्टोक्सच्या कर्णधारपदाची सर्वत्र चर्चा होत आहे. सामन्याच्या तिसर्या दिवशी स्टोक्सने आपल्या मैदानावरील फिल्ड प्लेसमेंट आणि निर्णयाने हालचालीने सर्वांना प्रभावित केले. आता श्रीलंकेचा दिग्गज कुमार संगकाराही बेन स्टोक्सच्या नेतृत्वाने प्रभावित झाला असून त्याचे कौतुक केले आहे.
इंग्लंडच्या विजयाची शक्यता अधिक – कुमार संगकारा
अॅशेस मालिकेतील पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाची पडझड पाहता, इंग्लंड क्रिकेट संघाला सामना जिंकण्याची चांगली संधी असल्याचे श्रीलंकेच्या दिग्गज खेळाडूला वाटते. त्याचबरोबर त्याने चौथ्या दिवशी यजमान आक्रमक पध्दतीचा अवलंब करतील आणि आपला डाव घोषित करतील.
कुमार संगकाराने स्काय स्पोर्ट्सला सांगितले की, “ही अशी स्थिती आहे, जिथे इंग्लंज पुढे आहे. विशेषत: स्टोक्सला समजले आहे की, तळातील फलंदाजांसाठी एकेरी आवश्यक नसते. त्या संधींचा फायदा घेण्यासाठी फील्ड खरोखरच तयार होते. ते ऑस्ट्रेलियन खेळाडूंना दाखवत होते की, त्यांना चान्स घेण्याची गरज आहे. ही कल्पना आणि नेतृत्व दोन्हीही खूप चांगले आहे. त्यातबरोबर इंग्लंडने आधीच सांगितले आहे की ते अनिर्णित राहिल्याने समाधानी होणार नाहीत.”
मोईन अलीची चांगली गोलंदाजी इंग्लंडच्या विजयासाठी आवश्यक –
माजी क्रिकेटपटूने अनुभवी इंग्लिश फिरकी गोलंदाज मोईन अलीचे महत्त्व देखील अधोरेखित केले, जो तिसऱ्या दिवशी सकाळी बोटाला दुखापत झाल्यानंतर मैदानाबाहेर गेला होता. यजमानांसाठी मोईनची भूमिका महत्त्वाची असल्याचे संगकाराला वाटते. कारण खेळपट्टी संथ गोलंदाजांना अनुकूल आहे आणि इंग्लंड चौथ्या डावात केवळ जो रूटवर अवलंबून राहू शकत नाही.
संगकारा म्हणाला की, “इंग्लंडला कठोर यार्ड चेंडू टाकण्यासाठी फिरकी गोलंदाजाची गरज आहे. चेंडू वळण घेत असून खाली राहत आहे. वेगवान गोलंदाजांसाठी ही खेळपट्टी किती सपाट होती. त्यांना विकेट मिळविण्यासाठी किती कठोर परिश्रम करावे लागले, ते तुम्ही पाहिले. त्यामुळे आता मोईन अलीची भूमिका महत्त्वाची आहे.”