Kumar Sangakkara played with Sanju Samson bat : राजस्थान रॉयल्सचे मुख्य प्रशिक्षक कुमार संगकाराने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये सांगितले आहे की, तो इंग्लंडमध्ये ग्रामीण क्रिकेट खेळताना बॅट वापरत आहे. ज्यावर भारतीय संघाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनने प्रतिक्रिया दिली आहे. सॅमसनने बुधवारी त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर राजस्थान रॉयल्सचा एक व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये संगकारा म्हणत आहे की तो सॅमसनच्या बॅटने यूकेमध्ये व्हिलेज क्रिकेट खेळत आहे. श्रीलंकेच्या दिग्गजाने युझवेंद्र चहलकडून काही क्रिकेट किटचीही मागणी केली होती, जी त्याने देण्याचे आश्वासन दिले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राजस्थान रॉयल्सने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये कुमार संगकारा म्हणाला, “माझ्या गावातील क्रिकेटमध्ये, माझ्याकडे संजूचे दोन बॅट आहेत. माझ्याकडे त्यांच्याशी संबंधित कोणतेही आठवण नसल्यामुळे त्याने मला त्याच्या दोन बॅट्स दिल्या. माझ्या घरी कोणतीही बॅट नाही आणि इतर किटही नाही. युझी (युझवेंद्र चहल) जर तू हे पाहत असशील, तर तुला आठवते की तू मला काही किट देण्याचे वचन दिले होते. तर ते लक्षात ठेव. मी पण त्याची वाट बघतोय.”

कुमार संगाकरला आपल्या बॅटने खेळताना पाहून संजू सॅमसनलाही आनंद झाला आहे. त्याने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करताना लिहिले, “कुमार संगाकर माझ्या बॅटने खेळत आहे, हाहाहा… हे एक स्वप्न आहे.”

संजू सॅमसनची इन्स्टा स्टोरी

आयपीएल २०२४ मध्ये राजस्थान रॉयल्सला दुसऱ्या प्लेऑफ्समध्ये नेण्यात संजू आणि संगकाराच्या जोडीने महत्त्वाची भूमिका बजावली, जिथे संघ सनरायझर्स हैदराबादकडून पराभूत झाला. संजूने या मोसमात १६ सामन्यात ५३१ धावा केल्या आहेत. या काळात त्याने पाच अर्धशतकेही झळकावली. तो या स्पर्धेतील सर्वाधिक धावा करणारा पाचवा खेळाडू होता.

हेही वाचा – Smriti Mandhana Birthday : जिच्या एका स्माइलने चाहते घायाळ होता, ती ‘नॅशनल क्रश’ कोणाला करतेय डेट? जाणून घ्या

आयपीएल २०२४ मधील दमदार कामगिरीच्या जोरावर संजू सॅमसनलाही इतर खेळांडूप्रमाणे टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघात स्थान मिळवण्यात यश आले. तो विश्वविजेत्या संघाचा भाग होता. मात्र, त्याला या स्पर्धेत एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. झिम्बाब्वे दौऱ्यावर संजू सॅमसन देखील संघाचा भाग होता, जिथे त्याने दोन डावात नाबाद १२ आणि ५८ धावा केल्या.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kumar sangakkara played with sanju samson bat in village cricket rajasthan royals share video vbm