कुमार संगकाराने दिमाखदार शतकी खेळी साकारल्यानंतर विश्वविक्रमी यष्टिरक्षणाची कामगिरी करीत श्रीलंकेला न्यूझीलंडविरुद्धच्या सातव्या एकदिवसीय सामन्यात ३४ धावांनी विजय मिळवून दिला. परंतु एकदिवसीय मालिकेवर मात्र न्यूझीलंडने ४-२ असे वर्चस्व प्राप्त केले. संगकारा सामनावीर, तर केन विल्यम्सन मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.
संगकाराच्या नाबाद ११३ धावांच्या बळावर श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ६ बाद २८७ धावा केल्या. मग न्यूझीलंडचा डाव ४६ षटकांत २५३ धावांत आटोपला. विल्यम्सनने न्यूझीलंडकडून सर्वाधिक ५४ धावा काढल्या. कोरे अँडरसनने २० चेंडूंत २९ धावा काढून त्यांना आशा दाखवल्या. परंतु संगकाराने त्याचा सुरेख एकहाती झेल टिपून विश्वविक्रमाला गवसणी घातली. ऑस्ट्रेलियाच्या अ‍ॅडम गिलख्रिस्टचा (४७२) विश्वविक्रम मोडीत काढून त्याने यष्टीपाठी ४७४ बळींचा नवा अध्याय प्रस्थापित केला. अखेरच्या सामन्यातील विजयामुळे श्रीलंकेला न्यूझीलंड भूमीवर थोडाफार आत्मविश्वास मिळाला आहे.
४७४
यष्टिरक्षकाचा बळींचा विक्रमकुमार संगकारा        
(झेल ३७८, यष्टिचीत ९६)
सामने ३९७

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

४७२
अ‍ॅडम गिलख्रिस्ट    
(झेल ४१७, यष्टिचीत ५५)
सामने २८७

४७२
अ‍ॅडम गिलख्रिस्ट    
(झेल ४१७, यष्टिचीत ५५)
सामने २८७