Kusal Mendis New Odi Captain And Wanindu Hasaranga New T20 Captain : श्रीलंका क्रिकेट बोर्डाने दासुन शनाकाकडून एकदिवसीय आणि टी-२० संघाचे कर्णधारपद काढून घेतले आहे. बोर्डाने कुसल मेंडिसला एकदिवसीय संघाचा कर्णधार आणि स्टार अष्टपैलू खेळाडू वानिंदू हसरंगा याची टी-२० संघाचा कर्णधार म्हणून नियुक्ती केली आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने झिम्बाब्वेविरुद्ध घरच्या मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी संभाव्य खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. ज्यामध्ये दासुन शनाका संघाचा भाग आहे, परंतु त्याला कर्णधारपदावरून हटवण्यात आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चरित असलंका दोन्ही फॉरमॅटचा उपकर्णधार –

श्रीलंका क्रिकेट बोर्डाने एकदिवसीय मालिकेसाठी २१ खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत. कुसल मेंडिसकडे वनडे संघाचे कर्णधारपद सोपवले आहे. त्याचप्रमाणे टी-२० संघाचे कर्णधारपद वानिंदू हसरंगाकडे सोपवण्यात आले आहे. चरित असलंकाला दोन्ही फॉरमॅटमध्ये संघाचा उपकर्णधार नियुक्त करण्यात आले आहे. झिम्बाब्वे संघ ६ जानेवारीपासून घरच्या मैदानावर श्रीलंकेविरुद्ध मर्यादीत षटकांची मालिका खेळणार आहे. ३ एकदिवसीय सामन्यांची मालिका ६ जानेवारीपासून सुरू होणार आहे. तसेच १४ जानेवारीपासून टी-२० मालिका खेळवली जाणार आहे.

दासुन शनाका वर्ल्ड कपमधून झाला होता बाहेर –

दासुन शनाकाने शेवटच्या वेळी विश्वचषकात कर्णधारपद भूषवले होते. विश्वचषक २०२३ च्या केवळ दोन सामन्यांनंतर शनाकाला दुखापतीमुळे संपूर्ण स्पर्धेतून बाहेर रहावे लागले होते. त्याच्या जागी कुसल मेंडिसने संपूर्ण स्पर्धेचे नेतृत्व केले. शनाकाने आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामनाही वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळला होता.

हेही वाचा – AUS vs PAK : मोहम्मद रिझवानला ‘फॅशन’ पडली महागात, रिस्टबँडला चेंडू लागल्याने झाला आऊट, पाहा VIDEO

श्रीलंकेचा प्राथमिक वनडे संघ –

कुसल मेंडिस (कर्णधार), चारिथ असलंका (उपकर्णधार), पथुम निसांका, अविष्का फर्नांडो, सदिरा समराविक्रामा, सहान अरचिगे, वानिंदू फर्नांडो, दासुन शानाका, कामिंदू मेंडिस, चमिका करुणारत्ने, जेनिथ लियांगे, वानिंदू हसरंगा, महेश तीक्षाना, दिलशान मदुशंका, दुष्मंथा चमीरा, दुनिथ वेललागे, प्रमोद मदुशन, असिथा फर्नांडो, अकिला धनंजय, जेफ्री वेंडरसे, चमिका गुणसेकरा.

हेही वाचा – IND vs SA : भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का, ‘हा’ स्टार गोलंदाज दुखापतीमुळे झाला बाहेर

श्रीलंकेचा प्राथमिक टी-२० संघ –

वानिंदू हसरंगा (कर्णधार), चरित असलंका (उपकर्णधार), पथुम निसांका, सदिरा समरविक्रमा, दासून शनाका, कामिंदू मेंडिस, चमिका करुणारत्ने, कुसल मेंडिस, महेश टीक्षाना, दिलशान मदुशंका, दुष्मंथा चमीरा,दुनिथ वेल्लालगे, प्रमोद मदुशन, अकिला धनंजय, जेफ्री वेंडरसे, अँजेलो मॅथ्यूज, धनंजय डी सिल्वा, कुसल परेरा, भानुका राजपक्षे, कामिंदू मेंडिस, बिनुरा फर्नांडो, नुवान तुषारा, मथिशा पाथिराना.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kusal mendis new odi captain and wanindu hasaranga new t20 captain of sri lanka team against zimbabwe series vbm