Kumar Kushagra has a glimpse of MS Dhoni : आयपीएल २०२४च्या लिलावात दिल्ली कॅपिटल्सने झारखंडचा खेळाडू कुमार कुशाग्राला ७.२० कोटी रुपयांना विकत घेतले. दिल्ली कॅपिटल्सने या अनकॅप्ड खेळाडूवर मोठा खर्च का केला? वास्तविक दिल्ली कॅपिटल्सचे क्रिकेट संचालक सौरव गांगुली यामागे काम करत होते. सौरव गांगुलीने लिलावापूर्वीच निर्णय घेतला होता की, कोणत्याही परिस्थितीत कुमार कुशाग्रला आपल्या संघात सामील करुन घ्यायचे. पण झारखंडच्या या यष्टीरक्षक फलंदाजाने सौरव गांगुली इतका प्रभावित का झाला?
गांगुलीने कुमार कुशाग्रामध्ये महेंद्रसिंग धोनीची झलक पाहिली –
खरं तर, दिल्ली कॅपिटल्सचे क्रिकेट संचालक सौरव गांगुली यांना कुमार कुशाग्रामध्ये महेंद्रसिंग धोनीची झलक दिसली. फलंदाजीव्यतिरिक्त कुमार कुशाग्राने देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपल्या यष्टिरक्षणाने खूप प्रभावित केले. या कारणास्तव सौरव गांगुलीला कोणत्याही किंमतीत कुमार कुशाग्रला दिल्ली कॅपिटल्समध्ये सामील करुन घ्यायचे होते.
कोण आहे कुमार कुशाग्र?
या युवा फलंदाजाचा जन्म २३ ऑक्टोबर २००४ रोजी झारखंडमधील बोकराव येथे झाला. तो उजव्या हाताचा फलंदाज असून विकेटकीपिंगही करतो. २०२१ मध्ये, या खेळाडूने आपला पहिला लिस्ट ए सामना खेळला, तर त्याच वर्षी त्याने टी-२० सामना खेळला. कुशाग्राने गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये झारखंडकडून दिल्लीविरुद्ध रणजी करंडक क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.
हेही वाचा – IPL Auction 2024 : पान टपरी चालविणाऱ्याचा मुलगा ठरला कोट्यधीश; जाणून घ्या कोण आहे शुभम दुबे?
कुमार कुशाग्रच्या वडिलांनी इंडियन एक्सप्रेसला सांगितले की, ट्रायल्सनंतर सौरव गांगुली खूप प्रभावित झाला. त्यावेळी त्याने कुमार कुशाग्रला आपल्या संघात सामील करण्यासाठी १० कोटी रुपयांपर्यंत बोली लावणार असल्याचे सांगितले होते. कुमार कुशाग्रामध्ये भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची झलक आपल्याला दिसते, असेही तो म्हणाला.
अशा प्रकारे कुमार कुशाग्रला ओळख मिळाली –
कुमार कुशाग्राने रणजी ट्रॉफी २०२२ मध्ये नागालँडविरुद्ध २६९ चेंडूत २६६ धावा केल्या होत्या. पण ज्या तुफानी शैलीत त्याने फलंदाजी केली, त्याने अनेकांचे लक्ष वेधून घेतले. यानंतर, देवधर ट्रॉफी २०२३ मध्ये, कुमार कुशाग्र सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आला आणि त्याने ५८ चेंडूत ६८ धावा केल्या. कुमार कुशाग्र मोठे फटके सहज मारू शकतो, असे म्हटले जाते. याशिवाय त्याने अनेक टप्प्यांवर स्वत:ला सिद्ध केले आहे.
दिल्ली कॅपिटल्सचा संघ: ऋषभ पंत, अक्षर पटेल, कुलदीप यादव, इशांत शर्मा, पृथ्वी शॉ, खलील अहमद, ललित यादव, प्रवीण दुबे, मुकेश कुमार, यश धुल, विकी ओस्तवाल, अभिषेक पोरेल, कुमार कुशाग्रा, रिकी भुई, सुमित कुमार, रसिक दार सलाम. विदेशी खेळाडू: डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, अॅनरिक नॉर्टजे, लुंगी गिडी, हॅरी ब्रूक, ट्रिस्टन स्टब्स
लिलावात विकत घेतले खेळाडू: कुमार कुशाग्रा (७.२ कोटी), हॅरी ब्रूक (४ कोटी), ट्रिस्टन स्टब्स (५० लाख), रिकी भुई (२० लाख), सुमित कुमार (१ कोटी), रशीक दार सलाम (२० लाख)