भारतीय संघाचा माजी कसोटीपटू वासिम जाफर सध्या सोशल मीडियावर आपली एक नवीन ओळख बनवतो आहे. आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचं फलंदाजी प्रशिक्षकपद सांभाळणाऱ्या जाफरने ट्विटरवरुन क्रिकेटशी संबंधित घटनांवर मिम्स शेअर करायला सुरुवात केली आहे.
आतापर्यंत जाफरने अनेक घटनांवर मिम्स शेअर करत आपल्यातला गमतीशीर अंदाज सर्वांना दाखवला आहे. IPL मध्ये पंजाबचं प्रतिनिधीत्व करणारा मॅक्सवेल संपूर्ण हंगामात अपयशी ठरला होता. परंतू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केल्यानंतर मॅक्सवेलने सलग दोन सामन्यांत भारतीय गोलंदाजांची धुलाई केली आहे. मॅक्सवेलच्या या खेळीवर जाफरने भन्नाट मिम शेअर केलं आहे. पाहा, काय म्हणतोय जाफर…
.@Gmaxi_32 #AusvInd pic.twitter.com/XG2ZHSXNA8
— Wasim Jaffer (@WasimJaffer14) November 29, 2020
ग्लेन मॅक्सवेलने ऑस्ट्रेलियाकडून पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येताना भारतीय गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. २९ चेंडूत ४ चौकार आणि ४ षटकारांसह मॅक्सवेलने नाबाद ६३ धावांची खेळी केली.