वृत्तसंस्था, वॉरसॉ

तारांकित आघाडीपटू किलियन एम्बापेने पदार्पणात साकारलेल्या गोलच्या जोरावर रेयाल माद्रिदने अटलांटाचा २-० असा पराभव करत ‘युएफा सुपर चषक’ फुटबॉलचे जेतेपद पटकावले.

D Gukesh How Much Prize Money Did Indian Grandmaster Win After Winning World Chess Championship
D Gukesh Prize Money: करोडपती झाला विश्विविजेता गुकेश, जागतिक बुद्धिबळ स्पर्धा जिंकल्यानंतर किती मिळाली बक्षिसाची रक्कम?
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Who Is D Gukesh Indian Grandmaster Who Became Youngest Ever World Chess Champion
Who is D Gukesh: कोण आहे डी गुकेश? वडिलांनी करिअर लावलं पणाला अन् लेक १८व्या वर्षी ठरला विश्वविजेता; वाचा त्याची कहाणी
ICC test Rankings Harry Brook Becomes No 1 Ranked Test Batter Virat Rohit Suffer Massive Dip
ICC Test Rankings: विराट-रोहितला कसोटी क्रमवारीत धक्का, जो रूटला मागे टाकत ‘हा’ खेळाडू पहिल्या स्थानी, टॉप-१० मध्ये भारताचे किती खेळाडू?
world chess championship loksatta
गुकेशच्या नवचैतन्याची कसोटी!
Sunil Gavaskar Statement on India Defeat
IND vs AUS: “हॉटेलच्या रूममध्ये बसून…”, सुनील गावस्कर पराभवानंतर भारतीय संघावर संतापले, रागाच्या भरात नेमकं काय म्हणाले?
Kalidas hirve , Vasai National Marathon Competition,
वसईत रंगली राष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा, साताऱ्याचा कालिदास हिरवे विजेता
Travis Head Fastest Century in Day Night Test Match IND vs AUS Adelaide Test
Travis Head: ट्रॅव्हिस हेडचे डे-नाईट कसोटीत सर्वात जलद शतक, स्वत:चा रेकॉर्ड मोडत केली मोठी कामगिरी; भारत बॅकफूटवर

गेल्या हंगामात चॅम्पियन्स लीग (रेयाल माद्रिद) आणि युरोपा लीग (अटलांटा) जिंकणाऱ्या संघांमध्ये ही लढत खेळवली जाते. यंदा या लढतीला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. विश्वातील सर्वोत्तम फुटबॉलपटूंमध्ये गणना होणाऱ्या एम्बापेचा रेयाल माद्रिदसाठी हा पहिला सामना होता. त्याला आपले गोलचे खाते उघडण्यासाठी फार वाट पाहावी लागली नाही. त्याने ६८व्या मिनिटाला गोल नोंदवत रेयालच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

त्याआधी इटालियन संघ अटलांटाने बलाढ्य स्पॅनिश संघ रेयालला कडवी झुंज दिली. एम्बापे, व्हिनिशियस ज्युनियर, ज्युड बेलिंगहॅम आणि रॉड्रिगो या रेयालच्या आक्रमणपटूंकडे सर्वांचे लक्ष होते. मात्र, प्रथमच एकत्रित खेळत असल्याने त्यांचा ताळमेळ जुळायला वेळ लागला. अटलांटाने पूर्वार्धात रेयालला रोखले होते. त्यामुळे मध्यंतराला दोन संघांत गोलशून्य बरोबरी होती.

हेही वाचा >>>Independence Day 2024: महेंद्रसिंग धोनी आणि सुरेश रैनाने १५ ऑगस्ट रोजीच का जाहीर केली निवृत्ती? रैनाने केला मोठा खुलासा

उत्तरार्धात मात्र रेयालच्या आक्रमणाला धार आली. ५९व्या मिनिटाला व्हिनिशियसच्या पासवर फेडेरिको वालवेर्डेने गोल करत रेयालला १-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर रेयालने अटलांटाच्या बचाव फळीवर दडपण कायम राखले. याचा फायदा त्यांना ६८व्या मिनिटाला मिळाला. प्रथम रॉड्रिगोने अटलांटाच्या बचावपटूकडून चेंडू घेत तो व्हिनिशियसकडे दिला. व्हिनिशियसने तो चेंडू बेलिंगहॅमकडे सोपवला. मग बेलिंगहॅमच्या पासवर एम्बापेने अप्रतिम गोल नोंदवत रेयालची आघाडी भक्कम केली.

यानंतर अटलांटाने पुनरागमनाचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना रेयालचा भक्कम बचाव भेदता आला नाही. युरोपा लीगच्या अंतिम सामन्यात हॅटट्रिक नोंदवणाऱ्या अॅडेमोला लुकमनला अटलांटाच्या अन्य आक्रमकपटूंची फारशी साथ लाभली नाही. त्यामुळे रेयालने नव्या हंगामातील आपल्या पहिल्याच सामन्यात विजय मिळवला आणि सुपर चषक पटकावला.

हेही वाचा >>>IND vs SL: सुपर ओव्हरचं विसरले अंपायर; भारत-श्रीलंका सामना राहिला टाय

६ रेयाल माद्रिदने सहाव्यांदा सुपर चषकावर नाव कोरले. त्यामुळे त्यांनी बार्सिलोनाला (५) मागे टाकत सर्वाधिक वेळा सुपर चषक जिंकण्याचा विक्रम आपल्या नावे केला. रेयालने २००२, २०१४, २०१६, २०१७, २०२२ आणि आता २०२४ मध्ये जेतेपद पटकावले.

५रेयाल माद्रिदचे खेळाडू डॅनी कार्वाहाल आणि लुका मॉड्रिच यांचे सुपर चषकातील हे पाचवे जेतेपद ठरले. त्यामुळे हे दोघे सुपर चषकातील सर्वांत यशस्वी खेळाडू ठरले आहेत. २०१४ पासून रेयालच्या प्रत्येक जेतेपदात त्यांचे योगदान आहे.

Story img Loader