वृत्तसंस्था, वॉरसॉ
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
तारांकित आघाडीपटू किलियन एम्बापेने पदार्पणात साकारलेल्या गोलच्या जोरावर रेयाल माद्रिदने अटलांटाचा २-० असा पराभव करत ‘युएफा सुपर चषक’ फुटबॉलचे जेतेपद पटकावले.
गेल्या हंगामात चॅम्पियन्स लीग (रेयाल माद्रिद) आणि युरोपा लीग (अटलांटा) जिंकणाऱ्या संघांमध्ये ही लढत खेळवली जाते. यंदा या लढतीला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. विश्वातील सर्वोत्तम फुटबॉलपटूंमध्ये गणना होणाऱ्या एम्बापेचा रेयाल माद्रिदसाठी हा पहिला सामना होता. त्याला आपले गोलचे खाते उघडण्यासाठी फार वाट पाहावी लागली नाही. त्याने ६८व्या मिनिटाला गोल नोंदवत रेयालच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
त्याआधी इटालियन संघ अटलांटाने बलाढ्य स्पॅनिश संघ रेयालला कडवी झुंज दिली. एम्बापे, व्हिनिशियस ज्युनियर, ज्युड बेलिंगहॅम आणि रॉड्रिगो या रेयालच्या आक्रमणपटूंकडे सर्वांचे लक्ष होते. मात्र, प्रथमच एकत्रित खेळत असल्याने त्यांचा ताळमेळ जुळायला वेळ लागला. अटलांटाने पूर्वार्धात रेयालला रोखले होते. त्यामुळे मध्यंतराला दोन संघांत गोलशून्य बरोबरी होती.
उत्तरार्धात मात्र रेयालच्या आक्रमणाला धार आली. ५९व्या मिनिटाला व्हिनिशियसच्या पासवर फेडेरिको वालवेर्डेने गोल करत रेयालला १-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर रेयालने अटलांटाच्या बचाव फळीवर दडपण कायम राखले. याचा फायदा त्यांना ६८व्या मिनिटाला मिळाला. प्रथम रॉड्रिगोने अटलांटाच्या बचावपटूकडून चेंडू घेत तो व्हिनिशियसकडे दिला. व्हिनिशियसने तो चेंडू बेलिंगहॅमकडे सोपवला. मग बेलिंगहॅमच्या पासवर एम्बापेने अप्रतिम गोल नोंदवत रेयालची आघाडी भक्कम केली.
यानंतर अटलांटाने पुनरागमनाचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना रेयालचा भक्कम बचाव भेदता आला नाही. युरोपा लीगच्या अंतिम सामन्यात हॅटट्रिक नोंदवणाऱ्या अॅडेमोला लुकमनला अटलांटाच्या अन्य आक्रमकपटूंची फारशी साथ लाभली नाही. त्यामुळे रेयालने नव्या हंगामातील आपल्या पहिल्याच सामन्यात विजय मिळवला आणि सुपर चषक पटकावला.
हेही वाचा >>>IND vs SL: सुपर ओव्हरचं विसरले अंपायर; भारत-श्रीलंका सामना राहिला टाय
६ रेयाल माद्रिदने सहाव्यांदा सुपर चषकावर नाव कोरले. त्यामुळे त्यांनी बार्सिलोनाला (५) मागे टाकत सर्वाधिक वेळा सुपर चषक जिंकण्याचा विक्रम आपल्या नावे केला. रेयालने २००२, २०१४, २०१६, २०१७, २०२२ आणि आता २०२४ मध्ये जेतेपद पटकावले.
५रेयाल माद्रिदचे खेळाडू डॅनी कार्वाहाल आणि लुका मॉड्रिच यांचे सुपर चषकातील हे पाचवे जेतेपद ठरले. त्यामुळे हे दोघे सुपर चषकातील सर्वांत यशस्वी खेळाडू ठरले आहेत. २०१४ पासून रेयालच्या प्रत्येक जेतेपदात त्यांचे योगदान आहे.