आशियाई क्रिडा स्पर्धेत बॉक्सिंगमध्ये पंचांच्या वादग्रस्त निर्णयामुळे कांस्य पदकावर समाधान मानाव्या लागलेल्या बॉक्सर सरिता देवीने बुधवारी पदक स्विकारण्यास नकार दिला आणि पंचांच्या निर्णयाचा निषेध व्यक्त केला.
पारितोषिक वितरण सोहळ्यात सरिता देवीला अश्रू अनावर झाले आणि तिने पदक स्विकारण्यास नकार दिला. सरिता देवी माध्यमांशी बोलताना म्हणाली की, पदक स्विकारायचे नाही असे अजिबात मनात नव्हते पण, पदक घेता क्षणी झालेल्या वादग्रस्त पराभवाच्या आठवणीने डोळ्यांत अश्रू दाटून आले आणि मी पदक परत केले. कारण, यापुढेही मी बॉक्सिंग खेळत राहणार असले तरी, या पराभवाची आठवण सदैव मनी येत राहील.
या वादग्रस्त पराभवानंतर भारतीय बॉक्सिंग चमूने आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशनकडे (एआयबीए) तक्रार दाखल केली होती; पण एआयबीएच्या तांत्रिक समितीने भारताची ही तक्रार फेटाळून लावली.

Story img Loader