हरयाणामधील लाहली हे छोटेसे गाव पहिलवानांसाठी ओळखले जाणारे, पण आखाडय़ांच्या या गावात आता क्रिकेटमय वातावरण पसरले आहे. याचे कारणही तसेच आहे. सचिन तेंडुलकर नावाचा क्रिकेटच्या दुनियेतील बेताज बादशाह आपल्या क्रिकेट कारकिर्दीतील अखेरचा रणजी सामना येथे खेळणार आहे. रविवारपासून हरयाणाविरुद्धच्या सामन्याने गतविजेत्या मुंबईच्या रणजी मोसमाला प्रारंभ होईल.
पुढील महिन्यात सचिन आपल्या कारकिर्दीतील अखेरची कसोटी मालिका खेळणार आहे. या पाश्र्वभूमीवर सचिनसाठी हा अखेरचा सराव सामना असेल. मुंबईतील दुसऱ्या कसोटीनंतर सचिन आपल्या २४ वर्षांच्या कसोटी कारकिर्दीला अलविदा करणार आहे.
रोहटकपासून १५ किमी अंतरावरील चौधरी बन्सी लाल स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्याची आसपासच्या गावागावांमध्ये मोठी चर्चा सुरू आहे. सचिनला याचि डोळा पाहण्यासाठी मोठी उत्कंठा येथे निर्माण झाली आहे.
लाहली लाइव्ह!
हरयाणामधील लाहली हे छोटेसे गाव पहिलवानांसाठी ओळखले जाणारे, पण आखाडय़ांच्या या गावात आता क्रिकेटमय वातावरण पसरले आहे.
![लाहली लाइव्ह!](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2013/10/k0771.jpg?w=1024)
First published on: 27-10-2013 at 06:23 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lahli laive sachin tendulkars last ranji on sunday in a corner of a haryana field