पॅरिस : भारताच्या लक्ष्य सेनने जागतिक क्रमवारीतील चौथ्या स्थानावर असलेल्या ऑल इंग्लंड आणि आशियाई विजेत्या जॉनथन ख्रिास्टीचा सरळ दोन गेममध्ये पराभव करून ऑलिम्पिक पदार्पणातच उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. लक्ष्यच्या बरोबरीने महिला गटातून पीव्ही सिंधूनेदेखील बाद फेरी गाठली आहे. भारताच्या २२ वर्षीय लक्ष्यने कमालीची प्रगल्भता दाखवताना सर्वोत्तम तंत्र राखणाऱ्या ख्रिास्टीचे आव्हान २१-१८, २१-१२ असे परतवून लावले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

‘‘ही लढत खूप कठीण होती. ज्या पद्धतीने माझा खेळ झाला, त्यावर मी समाधानी आहे. विशेष करून पहिल्या सेटला पिछाडी भरून काढण्यात लवकर यश आले आणि त्यानंतर लय कायम राखू शकलो. या क्षणानंतर कोर्टवर केवळ टिकून राहण्याचे आणि अचूक खेळ करायचे ठरवले,’’ असे लक्ष्य म्हणाला. लक्ष्य बाद फेरीसाठी सज्ज आहे. आजच रात्री उशिरा भारताचा आणखी एक खेळाडू एच. एस. प्रणॉयची व्हिएतनामच्या ले डुक पॅटशी लढत होणार आहे. ही लढत जिंकल्यास प्रणॉयही बाद फेरीत दाखल होईल आणि उपउपांत्यपूर्व फेरीत लक्ष्य व प्रणॉय आमने-सामने येतील.

हेही वाचा >>>Umpire Injured : शेवटच्या चेंडूवर विजयी षटकार मारल्यानंतर फलंदाजाच्या सेलिब्रेशनमुळे अंपायरला दुखापत, पाहा VIDEO

महिला विभागात दोन वेळच्या ऑलिम्पिक पदक विजेत्या सिंधूने आपल्या गटातून बाद फेरी गाठताना आणखी एका पदकाकडे भक्कम पाऊल टाकले. सिंधूने अखेरच्या साखळी लढतीत एस्टोनियाच्या क्रिस्टीन कुबाचा २१-५, २१-१० असा सहज पराभव केला. ‘‘गटात अव्वल राहणे खूप महत्त्वाचे होते. मी खूप समाधानी आहे. बाद फेरीतील आव्हानाच्या दृष्टीने हे विजय महत्त्वाचे होते. उपउपांत्यपूर्व फेरीत माझी गाठ हे बिंगजिआओशी पडण्याची शक्यता आहे. आता खऱ्या आव्हानास सुरुवात होईल. यासाठी मी सज्ज आहे,’’ असे सिंधू म्हणाली.