अर्जुन पुरस्कार विजेता आणि बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता शटलर लक्ष्य सेनवर वय चोरून लावल्याचा आरोप करण्यात आला आहे. माध्यमातील माहितीनुसार, त्याच्याविरुद्ध बेंगळुरूमध्ये एफआयआरही नोंदवण्यात आली आहे. वृत्तानुसार, लक्ष्य सेनवर कनिष्ठ स्तरावर स्पर्धा करताना वय-प्रतिबंधित स्पर्धांमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी त्याच्या वयाची फसवणूक केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

नागराज एमजी नावाच्या व्यक्तीच्या तक्रारीनंतर बंगळुरू पोलिसांनी लक्ष्य आणि त्याच्या बॅडमिंटन अकादमीच्या प्रशिक्षकाविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. नागराजा शहरात बॅडमिंटन अकादमीही चालवतो. अलीकडेच एका स्थानिक न्यायालयाने पोलिसांना २१ वर्षीय लक्ष्याविरुद्धच्या आरोपांची चौकशी करण्याचे निर्देश दिले होते. लक्ष्य बंगळुरूमधील प्रकाश पदुकोण बॅडमिंटन अकादमीमध्ये प्रशिक्षण घेतो.

vidarbh election
विदर्भातील निवडणूक रिंगणात कोण कोणाचे नातेवाईक ?
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट…
Action taken against constable who asked for bribe to help accused
आरोपीला मदत करण्यासाठी लाच मागणाऱ्या हवालदारावर कारवाई
court denied prearrest bail to thirteen accused in the Sassoon Hospital embezzlement case
ससूनमध्ये चार कोटींचा घोटाळा, तेरा आरोपींचा अटकपूर्व जामीन फेटाळला
cold play online tickets
कोल्ड प्लेसारख्या कार्यक्रमांच्या ऑनलाईन तिकीट विक्रीतील काळाबाजार रोखा, जनहित याचिकेद्वारे उच्च न्यायालयात मागणी
nagpur city police bust sex racket at hotel oyo
दिल्ली-मुंबईच्या मॉडेल तरुणी; नागपूरचे ओयो हॉटेल अन् देहव्यापार…
Ghatkopar bill board accident, Bhavesh Bhinde, Bhavesh Bhinde granted bail,
घाटकोपर फलक दुर्घटना : आरोपी भावेश भिंडेला सत्र न्यायालयाकडून जामीन
Kolhapur Shivaji university
भविष्य निर्वाह निधी विभागाची शिवाजी विद्यापीठाला कारणे दाखवा नोटीस, भ्रष्टाचाराच्या आरोपाने खळबळ

हेही वाचा :   IND vs BAN 1st ODI: यजमानांच्या भेदक गोलंदाजीसमोर टीम इंडियाची सपशेल शरणागती, विजयासाठी केवळ १८७ धावांचे आव्हान

एफआयआरमध्ये लक्ष्याच्या कुटुंबीयांची आणि प्रशिक्षकाचीही नावे

एफआयआरमध्ये लक्ष्य, त्याचे प्रशिक्षक विमल कुमार, त्याचे वडील धीरेंद्र सेन, त्याचा भाऊ चिराग आणि आई निर्मला सेन यांचा समावेश आहे. चिराग स्वतः बॅडमिंटनपटू आहे आणि धीरेंद्र भारतीय क्रीडा प्राधिकरणात प्रशिक्षक आहेत. माध्यमातील माहितीनुसार, नागराजाचा आरोप आहे की प्रशिक्षक विमल यांनी लक्ष्याच्या आई-वडिलांच्या सहकार्याने २०१० मध्ये जन्म प्रमाणपत्र तयार केले होते, ज्यामध्ये चिराग आणि लक्ष्य यांच्या वयात हेराफेरी करण्यात आली होती. यामुळे त्याला वयोगटातील स्पर्धांमध्ये भाग घेता आला. अन्यथा तो स्पर्धेसाठी अपात्र ठरला असता.

हेही वाचा :   IND vs BAN 1st ODI: हवेत सूर मारत लिटन दासने घेतला अफलातून झेल, विराट कोहलीही झाला अवाक्

फिर्यादीने असे म्हटले आहे की, कर्नाटक बॅडमिंटन असोसिएशन आणि प्रशिक्षक विमल कुमार यांच्या पाठिंब्याने लक्ष्यने त्याच्या वयोगटातील कमी स्पर्धकांविरुद्ध खेळण्यास सुरुवात केली. तसेच वयाचा फायदा म्हणून लक्ष्याने अनेक स्पर्धा जिंकल्या आणि सरकारकडून अनेक फायदे मिळवले. यामुळे इतर हुशार मुलांचे नुकसान झाले. असे त्याने नोंदवलेल्या एफआयआरमध्ये माहिती दिली आहे. त्याने केलेल्या आरोपानुसार लक्ष्यचा जन्म १९९८ मध्ये झाला होता, मात्र सरकारी रेकॉर्डमध्ये त्याचे जन्मवर्ष २००१ मध्ये झाल्याचे दिसून येते. अशी माहिती त्याने गुन्हा नोंदवताना दिली आहे. भारतीय दंडसंहितेच्या ३४ व्या कलमानुसार दोषी ठरवण्यात यावे, असेही नागराजा यांनी म्हटले आहे.

प्रशिक्षक विमल कुमार यांनी आरोप फेटाळून लावले

मात्र, प्रशिक्षक विमल कुमार यांनी एफआयआरमधील आरोपांबाबत माहिती असण्याचा इन्कार केला. तो म्हणाला- तक्रारदाराने लावलेल्या आरोपांची मला माहितीही नाही. यात माझी कोणतीही भूमिका नाही. लक्ष्य आमच्या अकादमीत आला आणि मी त्याला २०१० पासून इतर मुलांप्रमाणे प्रशिक्षण दिले. मी ऐकले होते की एक कुटुंब अकादमी आणि माझी प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु त्याचा आम्हाला कधीही त्रास झाला नाही.