भारताचा युवा शटलर लक्ष्य सेनने डेन्मार्क ओपन बॅडमिंटन स्पर्धेतून आपल्याच सहकाऱ्याचा पराभव केला. त्याचवेळी, माजी चॅम्पियन किदाम्बी श्रीकांतही उपांत्यपूर्व (प्री-क्वार्टर) फेरीतील पराभवामुळे या डेन्मार्क ओपन सुपर -७५० स्पर्धेतून बाहेर पडला. दुहेरीत सात्विक साईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीने शानदार विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

मूळचा उत्तराखंडचा असलेल्या लक्ष्य सेनने उपांत्यपूर्व फायनलमध्ये एचएस प्रणॉयचा पराभव केला. जागतिक क्रमवारीत ८व्या स्थानावर असलेल्या लक्ष्यने ३९ मिनिटे रंगलेल्या या सामन्यात २१-९, २१-१८ असा विजय मिळवला. आतापर्यंत प्रणॉय आणि लक्ष्य सेनमधील लढतीत दोघांनी २-२ सामने जिंकून बरोबरी साधली. मात्र आजच्या सामन्यात युवा सेनने प्रणॉयपेक्षा सरस खेळ केला. या विजयासह लक्ष्य सेन आणि एच एस प्रणॉय यांच्यातील एकूण सामने हे १० पेक्षा अधिक झाले असून समोरासमोरील लढतीत ३-२ असा विक्रम सेनने आपल्या नावे केला आहे.

hitendra thakur slams bjp for marathon
मॅरेथॉन घेण्याची ताकद आहे का? राजकारण करणार्‍या भाजपला हितेंद्र ठाकूरांचा सवाल
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
WTC Points Table India slip to 3rd after after IND vs AUS Pink Ball Test Defeat Australia No 1 again
WTC points Table: ना पहिलं, ना दुसरं स्थान, भारताला दुसऱ्या कसोटी पराभवानंतर WTC गुणतालिकेत मोठा धक्का; ‘या’ क्रमांकावर घसरला संघ
anmol kharb
अनमोल, सतीशसह अश्विनी-तनिषा अंतिम फेरीत
IND vs AUS Controversial Umpiring Over R Ashwin LBW Appeal as Mitchell Marsh Given Out KL Rahul DRS b
IND vs AUS: राहुल आऊट अन् मार्श नॉट आऊट, तिसऱ्या पंचांचा पुन्हा एकदा भारताविरूद्ध निर्णय; मैदानात नेमकं काय घडलं?
भूगोलाचा इतिहास : प्रतिभेचा कालजयी आविष्कार – आर्यभटीय
world chess championship 9th game between d gukesh and ding liren ends in draw
डाव नवा, निकाल तोच! गुकेशच्या प्रयत्नांना अपयशच; सलग सहावी बरोबरी
India australia pink ball test match review in marathi
‘गुलाबी’ आव्हानासाठी सज्ज; प्रकाशझोतातील कसोटी आजपासून; भारताचे आघाडी दुपटीचे लक्ष्य

माजी चॅम्पियन किदाम्बी श्रीकांतही ओडेन्स येथे सुरू असलेल्या स्पर्धेत पराभूत होऊन बाहेर पडला. उपांत्यपूर्व फायनलमध्ये सिंगापूरच्या लोह कीन यियूकडून सरळ गेममध्ये पराभूत होऊन श्रीकांत डेन्मार्क ओपन सुपर ७५० स्पर्धेतून बाहेर पडला. ३५ मिनिटे चाललेल्या सामन्यात श्रीकांतला सातव्या मानांकित प्रतिस्पर्ध्याकडून १३-२१, १५-२१ असा पराभव पत्करावा लागला. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत -२०२१मध्ये रौप्य पदक जिंकणाऱ्या श्रीकांतने २०१७ मध्ये येथे विजेतेपद पटकावले होते. गुरुवारी झालेल्या सामन्यापूर्वी यिऊविरुद्धचा त्याचा विजयी विक्रम १-१ असा बरोबरीत होता.

हेही वाचा :  T20 World Cup 2022:  टी२० विश्वचषकात आयर्लंडकडून पराभूत झाल्याने वेस्ट इंडिजचा पत्ता कट, सोशल मीडियावर आला मीम्सचा पूर 

भारतीयांनी दुहेरीत विजय मिळवला

पुरुष दुहेरीत सात्विक साईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या सातव्या मानांकित जोडीने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. भारतीय दुहेरी जोडीने इंडोनेशियाच्या मोहम्मद शोहिबुल फिकरी आणि मौलाना बगास यांचा २१-१४, २१-१६ च्या फरकाने अनुक्रमे ३६ आणि १६ मिनिटांच्या फेरीत पराभव केला. आता उपांत्यपूर्व फेरीत पुढील सामना हा चौथ्या मानांकित मलेशियाच्या अॅरॉन चिया आणि सोह वुई यिक या जोडीशी होईल.

हेही वाचा :   आशिया चषक २०२३ खेळण्यासाठी भारतीय संघ पाकिस्तानात जाणार? बीसीसीआय अध्यक्षांनी दिले स्पष्टीकरण

महिला दुहेरीत त्रिशा जॉली, गायत्री गोपीचंद आणि मिश्र दुहेरीत इशान भटनागर, तनिषा क्रॅस्टो ही जोडी आपापल्या उपउपांत्यपूर्व फेरीत पराभूत झाल्याने स्पर्धेतून बाहेर पडली. त्रिशा आणि गायत्री यांना थायलंडच्या जोंगकोलफान कितिथाराकुल या सहाव्या मानांकित जोडीने २३-२१, २१-१३ असे पराभूत केले. इशान आणि तनिषाला दुसऱ्या मानांकित जपानच्या युता वातानाबे आणि अरिसा हिगाशिनो या जोडीकडून १६-२१, १०-२१ असा पराभव पत्करावा लागला.

Story img Loader