वादग्रस्त माजी आयपीएलप्रमुख ललित मोदी यांची शनिवारी राजस्थान क्रिकेट असोसिएशनच्या (आरसीए) अध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. स्थानिक भाजप नेते अमिन पठाण यांच्या नेतृत्वाखालील बंडखोर गटाने सत्तेवर दावा केला आहे.
शनिवारी झालेल्या आरसीएच्या अतिरिक्त सर्वसाधारण सभेत पठाण यांची प्रभारी अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. अध्यक्षपदावर निवड झाल्यानंतर पाच महिन्यांतच मोदी यांच्या कार्यकाळाचा नाटय़मय शेवट झाला आहे.
मोदी हटाव मोहिमेअंतर्गत आरसीएशी संलग्न ३३ पैकी २३ जिल्हा क्रिकेट संघटनांनी पठाण यांना पाठींबा दिला. बीसीसीआयने आरसीएवर आजीवन बंदी घातल्यानंतर येथील क्रिकेटच्या भवितव्यापुढे अंध:कार पसरला होता. परंतु ताज्या घडामोडींमुळे राजस्थानला अभय मिळण्याची शक्यता आहे.

Story img Loader