आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी यांची राजस्थान क्रिकेट मंडळाच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी झाली आहे. त्यांच्याविरुद्ध अमिन पठाण यांच्या गटाने दाखल केलेला अविश्वासाचा ठराव मंजूर झाला.
राजस्थान क्रिकेट मंडळाच्या विशेष सर्वसाधारण सभेत खूप गोंधळ झाला. क्रीडा परिषदेचे अध्यक्ष जे.सी.महंती यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेसाठी पठाण गटाने मतदारांना आपल्या वाहनांमधून आणले व आपल्या बाजूने मतदान करण्यास भाग पाडले, असा आरोप मोदी गटातर्फे करण्यात आला. त्यामुळे सभेत उपस्थित असलेल्या दोन्ही गटांच्या सदस्यांमध्ये हाणामारीला सुरुवात झाली. त्यामध्ये अनेक जिल्हा प्रतिनिधी जखमी झाले. नियोजित वेळेपेक्षा उशिरा आलेल्या सदस्यांना मतदान करण्यास मनाई करण्यात आली.

Story img Loader