कर्णधाल लसिथ मलिंगाने केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर श्रीलंकेने पल्लकेलेच्या मैदानावर खेळवण्यात आलेल्या अखेरच्या टी-२० सामन्यात ३७ धावांनी बाजी मारली आहे. ३ सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंडच्या संघाने २-१ ने बाजी मारली आहे. १२६ धावांच्या छोटेखानी लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ ८८ धावांपर्यंत मजल मारु शकला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना श्रीलंकेच्या फलंदाजीची घसरगुंडी उडाली. गुणतिलका, निरोशन डिकवेला, मधुशनका आणि डि सिल्वा या फलंदाजांचा अपवाद वगळता एकही फलंदाज दोन आकडी धावसंख्या गाठू शकला नाही. त्यामुळे २० षटकांत यजमान श्रीलंकेचा संघ ८ गड्यांच्या मोबदल्यात १२५ धावांपर्यंत मजल मारु शकला.

प्रत्युत्तरादाखल मैदानात उतरलेल्या न्यूझीलंडच्या संघाचं लंकेचा कर्णधार मलिंगाने कंबरडच मोडलं. सामन्यात तिसऱ्या षटकात मलिंगाने ४ चेंडूत ४ फलंदाजांना माघारी धाडत न्यूझीलंडला धक्का दिला. यादरम्यान मलिंगाने आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये बळींचं शतक पूर्ण केलं. अशी कामगिरी करणारा लसिथ मलिंगा पहिलाच गोलंदाज ठरला.

श्रीलंकेकडून लसिथ मलिंगाने ५, अकिला धनंजयाने २ तर संदकन आणि डि सिल्वा यांनी १-१ बळी घेतला. अखेरच्या फळीत टीम साऊदीने न्यूझीलंडला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचे प्रयत्न अपुरेच पडले.