मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा अखेरचा ऐतिहासिक दोनशेवा सामना नेमका कुठे होणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती, पण हे कोडे आता सुटले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांनी सचिनच्या विनंतीचा आदर ठेवत दोनशेवा सामना तो ज्या मैदानावर लहानाचा मोठा झाला त्या वानखेडेवर खेळवण्याचे आश्वासन मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (एमसीए) रवी सावंत यांना दिले आहे. बीसीसीआयच्या कार्यक्रम आणि वेळापत्रक समितीची बैठक मंगळवारी होणार असून त्या बैठकीमध्ये या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे.
तसेच मुख्यम्हणजे सचिनने हा निर्णय आपल्या आईसाठी घेतला आहे. सचिनची आई रजनी यांनी आतापर्यंत आपल्या मुलाचा एकही आंतरराष्ट्रीय सामना स्टेडिअममध्ये पाहिलेला नाही. आपल्या आयुष्यातील सर्वात भावूक क्षणी आई स्टेडिअममध्ये असावी असे सचिनला वाटते. सचिनची आई रजनी तेंडुलकर आता व्हीलचेअरवर असतात. तब्येत खराब असतानाही मैदानावर सचिन फलंदाजी करीत असताना मैदानावर उपस्थित राहण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे अखेरचा कसोटी सामना मंबईत व्हावा अशी सचिनची इच्छा आहे.
सचिनच्या निवृत्तीने देश भावनिक- युवराज सिंग
सचिनच्या निर्णयाने संजय पटेल यांचा त्रिफळा
आईसाठी सचिन मुंबईत खेळणार अखेरची कसोटी..
सचिनने हा निर्णय आपल्या आईसाठी घेतला आहे. सचिनची आई रजनी यांनी आतापर्यंत आपल्या मुलाचा एकही आंतरराष्ट्रीय सामना स्टेडिअममध्ये पाहिलेला नाही.
First published on: 12-10-2013 at 02:37 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Last test venue wankhede it is for mom