भारताला दोन वेळा विश्वचषक जिंकून देणारा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी भारतीय टीमसोबत वर्ल्डकपमध्ये असणार आहे. यंदाच्या T20 World Cup मध्ये धोनी भारतीय संघाचा मेंटॉर अर्थात मार्गदर्शक म्हणून संघासोबत असेल, असं बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी जाहीर केलं होतं. यापूर्वी धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती घेतली आहे. सध्या धोनी आयपीएलमध्ये सीएसके संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. दरम्यान, महेंद्रसिंह धोनी आयपीएलमधून कधी निवृत्त होईल? याबाबत माजी खेळाडूने खुलासा केला आहे.
माजी ऑस्ट्रेलियन फिरकीपटू ब्रॅड हॉगचा असा विश्वास आहे की, आयपीएल लीगमधील महेंद्रसिंह धोनीचे हे शेवटचे वर्ष असू शकते. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात धोनी १ धावांवर बाद झाल्यानंतर हॉगचे हे वक्तव्य समोर आले आहे. २ दिवसांपूर्वी झालेल्या या सामन्यात KKR चा मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्तीने CSK कर्णधाराला क्लीन बोल्ड केले. ४ चेंडू खेळून तो बाद झाला. धोनीची बॅट गेल्या दोन आयपीएलपासून शांत आहे. त्याने गेल्या वर्षी १४ सामन्यांत २०० धावा केल्या होत्या आणि यावर्षी १० सामन्यांमध्ये केवळ ५० धावाच त्याला करता आल्या आहेत. हॉगचा असा विश्वास आहे की ४० वर्षीय धोनीवर वयाने वर्चस्व गाजवायला सुरुवात केली आहे.
विकेटकीपिंग शानदार
हॉगने आपल्या यूट्यूब चॅनेलवर सांगितले की, मला वाटते की तो वर्षाच्या अखेरीस आयपीएल क्रिकेटमधून निवृत्त होणार आहे, ज्या प्रकारे त्याला २ दिवसांपूर्वी चक्रवर्तीचा चेंडू त्याला समजला नाही आणि तो बोल्ड झाला. हे सांगत आहे की वय त्यांच्यावर वर्चस्व गाजवत आहे. त्याच्या बॅट आणि पॅडमध्ये खूप अंतर होते. मला वाटते की ४० वर्षीय धोनीची रिफ्लेक्स कमकुवत होऊ लागली आहेत. मात्र, त्याची विकेटकीपिंग शानदार आहे.
“धोनीच्या रणनीतीमध्ये ९० टक्क्यांपर्यंत…” मायकेल वॉनचे मोठे विधान
युवा क्रिकेटपटूंना विकसित करण्यात त्याचा मोलाचा वाटा
तो पुढे म्हणाला की भारतीय क्रिकेट आणि CSK साठी हे चांगले आहे की तो अजूनही त्याच्या कर्णधारपदामुळे खेळत आहे. तो शांत राहत परिस्थिती सांभाळतो. तसेच जडेजा व्यतिरिक्त इतर युवा क्रिकेटपटूंना विकसित करण्यात त्याचा मोलाचा वाटा आहे. कोलकाताविरुद्ध आऊट झाल्यानंतर तो ज्या प्रकारे पॅव्हेलियनमध्ये परतला, तेव्हा त्याच्या देहबोलीत आणि डोळ्यांमध्ये स्पष्ट दिसत होते की त्याने आता खेळण्याचा वेग गमावला आहे.
“जेव्हा आपण चांगले खेळत नाही…” केकेआरविरुद्ध विजय मिळवल्यानंतर धोनीची प्रतिक्रिया
CSK संघाचा मुख्य प्रशिक्षक बनू शकतो
गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या धोनीला टी -20 विश्वचषकासाठी टीम इंडियाचे मार्गदर्शक म्हणून निवडण्यात आले आहे. धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा म्हटले असेल. पण CSK मधील त्यांची भूमिका कायम राहील. तीन वेळा आयपीएल चॅम्पियन धोनीने फ्रँचायझीसह व्यवस्थापकीय भूमिका बजावण्याची आणि स्टीफन फ्लेमिंगसोबत संघाच्या कामावर देखरेख करण्याची अपेक्षा हॉगने केली आहे. तो मुख्य प्रशिक्षकही बनू शकतो. पुढच्या वर्षी मोठा लिलाव होणार असल्याने, CSK संपूर्ण बदल करू शकतो आणि धोनीशिवाय नवीन युगाची सुरुवात करू शकतो, असे हॉगने म्हटले आहे.