बांगलादेशमध्ये एकदिवसीय मालिका गमावणाऱया भारतीय संघातील खेळाडूंची निंदानालस्ती करण्याचा प्रकार बांगलादेशातील एका अग्रगण्य वृत्तपत्राने केला आहे. भारतीय संघातील खेळाडूंचा अर्धमुंडन केलेला फोटो बांगलादेशी वृत्तपत्राने मुखपृष्ठावर छापला आहे. बांगलादेशने पहिल्यांदाच भारतीय संघाविरुद्ध एकदिवसीय मालिका जिंकली. मात्र, विजयाच्या उन्मादाने खेळ भावनेला तिलांजली देत बांगलादेशच्या वृत्तपत्राने भारतीय खेळाडूंचा अपमानास्पद फोटो छापला आहे. भारतीय संघाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत सर्वात यशस्वी ठरलेला बांगलादेशचा युवा गोलंदाज मुस्ताफिझूर रहमानच्या हातात वस्तरा आणि त्याखाली भारतीय संघातील खेळाडूंचे अर्धमुंडन केलेला फोटो बांगलादेशात प्रकाशित करण्यात आला आहे. भारतीय खेळाडूंच्या हाती दाखविण्यात आलेल्या बॅनरमध्ये ‘आम्ही हा वस्तरा वपरला, तुम्हीही वापरू शकता’ असा अपमानास्पद संदेश देखील छापण्यात आला आहे.
bangad

Story img Loader