सिनसिनाटी टेनिस स्पर्धेत पाचव्या मानांकित लिएण्डर पेस आणि राडेक स्टेपानेक जोडीला पराभवाला सामोरे जावे लागले. व्हॅसेक पॉसपिसिल आणि जॅक सॉक जोडीने दुसऱ्या फेरीत पेस-स्टेपानेक जोडीवर ६-१, ४-६, १०-८ असा विजय मिळवला. या जोडीनेच भारताच्या रोहन बोपण्णा आणि पाकिस्तानच्या ऐसाम उल हक कुरेशी जोडीलाही नमवले होते. सानिया मिर्झा आणि कॅरा ब्लॅक जोडीला पहिल्या फेरीत पुढे चाल मिळाल्यामुळे स्पर्धेतील भारताचे आव्हान जिवंत आहे.

Story img Loader