Leander Paes and Vijay Amitraj join International Tennis Hall of Fame : दुहेरीतील माजी जागतिक क्रमवारीतील अव्वल खेळाडू लिएंडर पेस आणि टेनिस प्रसारक आणि खेळाडू विजय अमृतराज यांचा शनिवारी आंतरराष्ट्रीय टेनिस हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात आला. हे दोघेही आंतरराष्ट्रीय टेनिस हॉल ऑफ फेममध्ये सामील होणारे पहिले आशियाई पुरुष खेळाडू ठरले. प्रख्यात ब्रिटीश टेनिस पत्रकार आणि लेखक रिचर्ड इव्हान्स यांच्यासह या दोघांना हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट करण्यात आले. टेनिस हे करिअर म्हणून निवडण्यापूर्वी पेसने फुटबॉल आणि हॉकीमध्येही हात आजमावला आणि अखेरीस ऑलिम्पिक पदक विजेता म्हणून त्याच्या हॉकी-कर्णधार वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

‘माझ्यासाठी सर्वात मोठा सन्मान आहे’

पेस म्हणाला, ‘या मंचावर केवळ खेळातील महान व्यक्तींबरोबरच नाही तर माझ्या आयुष्यातील प्रत्येक दिवशी मला प्रेरणा देणाऱ्या लोकांसह असणे हा माझ्यासाठी सर्वात मोठा सन्मान आहे. माझ्या वडिलांनी मला नेहमी सांगितल्याप्रमाणे, जर तुमचा स्वतःवर विश्वास असेल तर तुम्ही कठोर परिश्रम करता, तुम्ही हे केवळ बक्षीस आणि ट्रॉफी जिंकण्यासाठी नाही तर जगाला प्रेरणा देण्यासाठी करता. सात ऑलिम्पिकमध्ये माझ्या देशवासीयांसाठी खेळणे, त्या सर्व डेव्हिस चषकांमध्ये राष्ट्रगीतासाठी उभे राहणे आणि आपण आशियाई ग्रँडस्लॅम जिंकू शकतो आणि आपल्या प्रदेशात प्रथम क्रमांक मिळवू शकतो हे सिद्ध करणे ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट होती.’

पेसने आपल्या कारकिर्दीत १८ ग्रँडस्लॅम जिंकली –

पेस दुहेरी आणि मिश्र दुहेरीत १८ वेळा ग्रँडस्लॅम चॅम्पियन राहिला आहे. अमृतराज युथ अकादमीत खेळल्यानंतर त्याची खेळाडू प्रकारात निवड झाली. पेस आणि अमृतराज यांच्यामुळे हॉल ऑफ फेममध्ये प्रतिनिधित्व करणारे भारत २८ वे राष्ट्र बनवले. पेस म्हणाला, ‘मला पाठिंबा देणाऱ्या माझ्या प्रत्येक देशवासीयांचे मी आभार मानू इच्छितो, जे चढउतारात माझ्या पाठीशी उभे राहिले. माझा स्वतःवर विश्वास नसताना मला मार्गदर्शन करण्यासाठी तुम्ही सर्वच माझी प्रेरणा, आधार, शक्ती होता.’

हेही वाचा – MS Dhoni : तुषार देशपांडेने धोनीला गुरुपौर्णिमेच्या दिल्या खास शुभेच्छा, इन्स्टावर वडिलांसह शेअर केला फोटो

अमृतराज यांनी अनेक जेतेपदे पटकावली –

७० वर्षीय अमृतराज यांनी १९७० मध्ये पदार्पण केले आणि १९९३ मध्ये निवृत्त झाले. या कालावधीत, त्यांनी १५ एटीपी एकेरी विजेतेपद आणि ३९९ सामने जिंकले आणि एकेरीमध्ये १८ वे स्थान प्राप्त केले. त्यांनी १९७४ आणि १९८७ मध्ये भारताला डेव्हिस कप फायनलमध्ये पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिका निभावली. अमृतराज म्हणाले, ‘या अविश्वसनीय आणि विशिष्ट समूहात सामील होण्याचा मला सन्मान वाटतो. या समूहाने या खेळाला वैभव प्राप्त करून दिले आहे.’

हेही वाचा – INDW vs UAEW: टीम इंडियाने पहिल्यांदाच ओलांडली दोनशेची वेस; ऋचा घोषची वादळी खेळी, युएईचा उडवला धुव्वा

अमृतराज यांनी अभिनय क्षेत्रातही केले आहे काम –

अमृतराज यांनी टेनिसमधून निवृत्ती घेतल्यानंतर मानवतावादी कामातही मदत केली. तसेच भारतातील एटीपी आणि डब्ल्यूटीए इव्हेंट्सला पाठिंबा दर्शवला. त्याचबरोबर जेम्स बाँड आणि स्टार ट्रेक यांसारख्या चित्रपट मालिकेतही काम केले. अमृतराज म्हणाले, ‘हा केवळ माझ्यासाठी, माझ्या कुटुंबासाठी, माझ्या पालकांसाठी नव्हे, तर जगभरात विविध ठिकाणी राहणाऱ्या माझ्या सर्व भारतीयांसाठी आणि माझ्या देशाचा सन्मान आहे.’