शांघाय मास्टर्स टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत राडेक स्टेपानेकच्या साथीने जेतेपद पटकावणाऱ्या लिएण्डर पेसने आंतरराष्ट्रीय क्रमवारीतील पाचवे स्थान कायम राखले आहे.
उपविजेतेपदावर समाधान मानावे लागलेल्या भूपती-बोपण्णा जोडीतील रोहन बोपण्णाने क्रमवारीत अव्वल दहामध्ये स्थान पटकावले आहे.
पेसचा साथीदार स्टेपानेकच्या क्रमवारीत दोनने सुधारणा झाली असून त्याने सहाव्या स्थानी झेप घेतली आहे. बोपण्णाने शांघाय मास्टर्स स्पर्धेद्वारे ६०० गुणांची कमाई करत तो दहाव्या स्थानी स्थिरावला आहे. भूपतीनेही सोळाव्या स्थानी आगेकूच केली आहे.
एकेरी प्रकारात युकी भांब्री हाच भारताचा सर्वोत्तम टेनिसपटू आहे. युकी २०४व्या स्थानी आहे. महिलांमध्ये सानिया मिर्झाच्या क्रमवारीत घसरण झाली असून ती १४व्या स्थानी आहे.

Story img Loader