ग्रँड स्लॅम स्पर्धामध्ये अव्वल दर्जाची कामगिरी करता यावी यासाठी मी सध्या सव्‍‌र्हिसमधील सुधारणांवर अधिक लक्ष देत आहे, असे भारताचा अव्वल दर्जाचा टेनिसपटू लिअँडर पेस याने सांगितले.
पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेद्वारे ग्रँड स्लॅम स्पर्धाना सुरुवात होत आहे. या स्पर्धेच्या तयारीबाबत तो म्हणाला, ‘‘पुढील वर्षी होणाऱ्या स्पर्धामध्ये माझी सव्‍‌र्हिस सर्वोत्तम व अचूक व्हावी यासाठी मी खूप कष्ट घेत आहे. अधिक प्रभावी सव्‍‌र्हिस व परतीचे खणखणीत फटके मारण्याबाबत माझ्या शैलीत बदल करीत आहे. लवचिकता आणणे हे माझ्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहे.’’

Story img Loader