लिएण्डर पेस आणि त्याचा चेक प्रजासत्ताकचा साथीदार राडेक स्टेपानेकला एटीपी वल्र्ड टूर फायनल्स स्पर्धेच्या दुसऱ्या लढतीत पराभवाला सामोरे जावे लागले. सलामीच्या लढतीत विजयानंतर या लढतीत पराभूत झाल्याने पेस-स्टेपानेक जोडीचा उपान्त्य फेरीचा मार्ग खडतर झाला आहे. स्पेनच्या डेव्हिड मारेइरो आणि फर्नाडो व्हर्डास्को जोडीने एक तास आणि २९ मिनिटांच्या लढतीत पेस-स्टेपानेक जोडीवर ६-४, ७-६ (५) अशी मात केली. उपान्त्य फेरीत प्रवेशासाठी पेस-स्टेपानेक जोडीला आता मार्केल ग्रॅनोलर्स आणि मार्क लोपेझ यांचा सामना करायचा आहे. या लढतीत विजयासह मारेइरो-व्हर्डास्को जोडीने उपान्त्य फेरीत प्रवेश केला.

Story img Loader